Home वणी परिसर रेणुका मातेची अखंड ज्योत दुर्गामाता मंदिरात

रेणुका मातेची अखंड ज्योत दुर्गामाता मंदिरात

● भक्‍तीरंगात रंगणार नवराञोत्‍सव

417
C1 20240404 14205351

भक्‍तीरंगात रंगणार नवराञोत्‍सव

Wani News : नवराञोत्‍सवात भाविक भक्‍तांच्‍या दर्शनांसाठी माहुरगडावरील रेणुका माता देवीची अखंड ज्‍योत प्रज्‍वलीत करुन आणण्‍यात येणार आहे. घटस्थापनेच्‍या शुभ मुहूर्तावर ज्‍योत याञेचे जंगी स्‍वागत करण्‍यात येणार असुन नागरीकांनी दर्शनांसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्‍यक्ष रवी बेलुरकर यांनी केले आहे. The perpetual flame of Renuka Mata Devi at Mahurgarh will be lit for the darshan of devotees.

नवसाला पावणारी देवी म्‍हणुन येथील नवशक्‍ती दुर्गा मातेचे मंदिर आंबेडकर चौकात स्थित आहे. नुकताच मंदिराचा जिर्णोध्‍दार थाटात करण्‍यात आला आहे. अतिशय सुंदर मंदिराचे निर्माण करण्‍यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी भक्तांसाठी भव्य मंदिर खुले करण्‍यात येणार आहे.

जागृत शक्तीपीठापैकी एक श्री रेणुका देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करुन ती वणी नगरीत आणण्याचा निर्धार नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष बेलुरकर यांनी केला. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दि.15 ऑक्टोबर ला सकाळी 4 वाजता या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. व सायंकाळी  5 वाजता वणी नगरीत आल्यावर मोठ्या जल्लोषात या ज्योत यात्रेचे स्वागत करुन ती अखंड ज्योत दुर्गामाता मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे.

अखंड ज्योत आणण्यासाठी ज्योत यात्रेत समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या सोबत दौलत वाघमारे,  प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल,  स्‍वप्‍नील बिहारी, मारोती गोखरे हे असणार आहेत तर याञेच्‍या स्‍वागतांसाठी दुर्गा माता मंदिर समितीचे सर्व सदस्य, वणीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
Rokhthok News