Home Breaking News आणि….वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

आणि….वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

1323

भुरकी येथील घटना

रोखठोक | तालुक्यातील भुरकी (रांगणा) शेतशिवारात गुरुवार दि. 10 नोव्हेंबर ला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने 25 वर्षीय युवकावर हल्ला केला. या अनपेक्षितपणे घटनेत तरुण दगवल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

अभय मोहन देऊळकर (25) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भुरकी शेत शिवारात शेतातील पिकाला पाणी देत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर झडप घेतली. या हल्ल्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घडलेली घटना शिवारातील शेतकरी, शेतमजूर यांना समजताच आरडाओरडा करून वाघाला पिटाळून लावले. तर जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले तसेच पोलीस व वन विभागाला सुचवण्यात आले.

तालुक्यात वाघाचा सातत्याने असलेला वावर, जंगल सदृश्य भागात होणारे वाघ्रदर्शन नित्याचे आहे. वणी विभागात वाघाचा मुक्तसंचार यामुळे शेतकरी, शेतमजुरांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी : बातमीदार