Home Breaking News सहनशीलतेचा अंत पाहू नका, उंबरकर कडाडले

सहनशीलतेचा अंत पाहू नका, उंबरकर कडाडले

● रस्‍तारोको आंदोलनाचा चौथा दिवस ● आंदोलन तिव्रतेकडे वळण्‍याची शक्‍यता ● हजारोटन कोळसा वाहतुक खोळंबली

1358
C1 20231210 17043342
Img 20240613 Wa0015

रस्‍तारोको आंदोलनाचा चौथा दिवस
आंदोलन तिव्रतेकडे वळण्‍याची शक्‍यता
हजारोटन कोळसा वाहतुक खोळंबली

MNS NEWS WANI : वेकोली निर्मीत धुलीकण प्रदुषणाने शेकडो हेक्‍टरवरील शेतपिके उध्वस्त झाली आहे. शेतकरी मदतीपासुन वंचित आहे, वेकोली प्रशासनाने पिडीत शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्यावा ही मागणी घेवून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने मागील चार दिवसांपासुन रस्‍तारोको आंदोलन पुकारले आहे. कोळसा वाहतुक करणारी वाहने रोखून धरण्‍यात आल्‍याने वेकोलीला दिवसाकाठी लाखो रुपयांचा फटका बसत आहे. The Maharashtra Navnirman Sena has called for a road strike since the last four days demanding immediate compensation to the farmers.

वेकोलीच्‍या माध्‍यमातुन उत्‍खनन झालेल्‍या कोळशाचे दळणवळण संपुर्ण भारतभर करण्‍यात येते. अनेक अवजड वाहनांतुन होत असलेली वाहतुक आणि यामुळे निर्माण होणाऱ्या धुलीकण प्रदुषणाने रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असणाऱ्या शेतातील शेतपिके पुर्णतः ध्‍वस्‍त झाली आहे. अनेक हेक्‍टरवरील शेतीची उत्‍पादन क्षमताच नष्‍ट झाली आहे. यामुळे स्‍थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असुन बहुतांश शेतकरी आत्‍महत्‍येच्‍या उंबरठ्यावर आहेत.

तालुक्यातील येणक, येनाडी, कोलगाव, शेवाळा,  साखरा,  शिवणी या परिसरातील 306 हेक्टर शेत जमीन बाधित झाली आहे. या जमिनीचे पंचनामे करुन वेकोली प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी यासाठी येथील शेतकऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केला तरी यावर वेकोली कडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या शेतकऱ्यांनी मनसेकडे हा मुद्दा मांडला आणि मनसेचे नेते राजु उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्‍यक्ष फाल्‍गुन गोहोकार व शेतकऱ्यांनी दिनांक 7 डिसेंबर पासुन येनक – येनाडी फाट्यावर रस्‍तारोको करत आंदोलनाला सुरुवात केली.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या माध्‍यमातुन शेतकरी हिताकरीता चार दिवसांपासुन आंदोलन सुरु आहे. अद्याप वेकोली व महसुल प्रशासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही. आंदोलनकर्त्‍यांच्‍या भावना संतप्‍त असुन आंदोलन तिव्रतेकडे वळण्‍याची शक्‍यता आहे. शनिवारी मनसे नेते राजु उंबरकर यांनी आंदोलनस्‍थळी भेट देत “शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका” असा वेकोली प्रशासनाला निर्वाणीचा ईशारा दिला आहे. तातडीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शांततेत चालु असलेले हे आंदोलन यापुढें उग्र स्वरूपाचे होईल यातुन होणाऱ्या सर्व परिणाम वेकोली जबाबदार असेल असे स्‍पष्‍ट केले आहे.
Rokhthok News

C1 20240529 15445424