Home Breaking News लग्नाचे आमिष, वारंवार लैंगिक शोषण आणि ‘पोक्सो’

लग्नाचे आमिष, वारंवार लैंगिक शोषण आणि ‘पोक्सो’

1277
C1 20240404 14205351

आरोपीला अटक, 3 दिवसाची पोलीस कोठडी

वणी: अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. मागील तीन वर्षांपासून वारंवार लैंगिक शोषण केले. सातत्याने होणारा अतिरेक सहन न झाल्याने ‘तिने’ थेट पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून त्या तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणेश वरारकर (21) असे आरोपीचे नाव असून तो शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील निवासी आहे. पीडिता ही त्याच गावातील रहिवाशी असून पीडितेचा भाऊ आरोपीचा मित्र होता यामुळे त्याचे घरी येणे-जाणे असायचे. यातून त्यांची ओळखी झाली, कालांतराने त्याने तिला प्रपोज केले. पहिल्यांदा तिने नकार दिला मात्र नंतर लग्नाचे आमिष दाखवताच तिने होकार दिला आणि घात झाला.

त्या दोघात प्रेम संबंध प्रस्थापित झाले, लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारिरीक शोषण करू लागला. जेव्हा हवं तेव्हा तो तिचा उपभोग घेत होता. त्यातच तो जबरदस्ती करायला लागला. घटनेच्या दिवशी दि. 10 जानेवारीला रात्री 9 वाजता तो पुन्हा पीडितेच्या घरी पोहचला आणि बळजबरीने तिला बाहेर जाण्यासाठी आग्रह धरला तिला मारहाण करत आई व आजोबाला शिवीगाळ केली.

घडलेल्या प्रकारामुळे घरची मंडळी प्रचंड भेदरली, त्याचा होत असलेला अत्याचार सहन न झाल्याने पीडिता व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले. मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या अत्याचाराबाबतचे कथन केले. पोलिसांनी कोणताही विलंब न करता त्याच रात्री आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपी गणेश वरारकर याला अटक करण्यात आली असून त्याचेवर भादंवि च्या कलम 376 (2) (3) (J)(N), 452, 323, 506 व सहकलम 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास SDPO संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात PSI शिवाजी टीपूर्णे करीत आहे.
वणी: बातमीदार