Home Breaking News शुक्रवारी निःशुल्क मार्गदर्शन आणि वास्तुदोष निवारण

शुक्रवारी निःशुल्क मार्गदर्शन आणि वास्तुदोष निवारण

175
C1 20240404 14205351

सोबत आणावा लागेल घराचा नकाशा

रोखठोकः दिल्‍ली येथील महावास्‍तु संस्थेतून वास्‍तु शास्‍ञात आचार्य पदवी प्राप्‍त करणारे आचार्य राहुल आसुटकर हे प्रत्‍येक शुक्रवारी वास्‍तुदोष निवारण आणि विस्‍तृत मार्गदर्शन निःशुल्‍क करणार आहेत. यावेळी सोबत घराचा नकाशा आणावा लागेल असे स्‍पष्‍ट करत या संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.

वास्‍तु आणि कार्यालयीन जागा सदोष असल्‍याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्‍यय अनेकांना येत असल्‍याचे सभोवताल बघायला मिळते. आरोग्य व वास्तूचा फार जवळचा संबंध आहे याकरीता वास्‍तुदोष निवारण आणि मार्गदर्शन अत्‍यंत गरजेचे झाले आहे.

पारिवारिक आरोग्य राखण्यासाठी जिथे राहतो वा वावरतो, काम करतो ती वास्तू प्रसन्न असायला हवी. आरोग्याच्या दृष्टीने वास्तूदोष म्हणजे त्या वास्तूत राहत असताना आपल्याला कोणतेही विकार व्हायला नकोत याकरीता आचार्य राहुल आसुटकर योग्‍य मार्गदर्शन करतील. घर व कार्यालयामध्‍ये विना तोड फोड वास्‍तु उपाय ते सुचवतात तसेच पंचतत्‍व, 32 प्रवेश दारांचे प्रभाव, भुमी एनर्जी, 16 दिशांचे महत्‍व,  सतव,  रजस, तमस संतुलन, वास्‍तु उपाय, घरांमध्‍ये रंगाचे प्रभाव यावर निवारण आणि मार्गदर्शन करतात.

 शुक्रवारी येथील उत्‍तरवार मोटर्स टीव्‍हीएस शोरूम मध्‍ये दुपारी 3 ते 6 वाजतापर्यंत निःशुल्‍क वास्‍तुदोष निवारण आणि मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. तरी इच्‍छूकांनी संपर्क साधावा असे आवाहन आचार्य राहुल आसुटकर (9657344388) यांनी केले.

Previous articleतरुण धान्य व्यापाऱ्याची आत्महत्या
Next articleश्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.