Home Breaking News snakebite….सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू

snakebite….सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू

● घरकाम करताना घडली घटना

1613

घरकाम करताना घडली घटना

रोखठोक | आपल्या घरातील लहानसहान काम करण्यात व्यस्त असलेल्या महिलेला विषारी सापाने दंश केला. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. 11 एप्रिलला पहाटे घडली. A woman was bitten by a poisonous snake. She was rushed to a rural hospital and died during treatment.

विद्या संतोष केमेकर (45) असे मृतकाचे नाव आहे. त्या तालुक्यातील नांदेपेरा येथील निवासी होत्या. नेहमी प्रमाणे पहाटे उठून त्या घरकाम करत होत्या. घरातच लपून बसलेल्या विषारी सापाने त्यांच्या हाताला चावा घेतला.

घडलेल्या प्रकाराने त्या कमालीच्या घाबरल्या, पारिवारिक मंडळींनी सकाळी 7 वाजता त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांचेवर उपचार सुरू केले मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत पोलीसांना सूचित करण्यात आले असून उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे.
वणी: बातमीदार