Home Breaking News त्यांना… पंतप्रधान कधी पासून आवडायला लागले..!

त्यांना… पंतप्रधान कधी पासून आवडायला लागले..!

● ऍड. आंबेडकरांचा रोखठोक प्रश्न ● इलेक्ट्रॉरल बाँड सर्वात मोठा घोटाळा

629
C1 20240411 20084099

ऍड. आंबेडकरांचा रोखठोक प्रश्न
इलेक्ट्रॉरल बाँड सर्वात मोठा घोटाळा

Political News | मागील 14 वर्षात देशाच वाटोळं झाल असून देशाला बरबाद करणारा हा असा निर्बुद्ध पंतप्रधान तुम्हाला कधी पासून आवडायला लागले आहे. असा रोखठोक सवाल सनातन हिंदू धर्माच्या लोकांना वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारला. ते येथील शासकीय मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. Since when did he start liking the Prime Minister..!

चंद्रपूर -आर्णी – वणी लोकसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर हे वणीत आले होते. ते पुढे सभेला संबोधित करताना म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉरॉल बाँड च्या माध्यमातून एक प्रकारे हप्ते वसुलीचे काम केले आहे.

पुढे बोलताना ऍड. आंबेडकर म्हणाले की, गल्लीतील दादा जे करतो तेच काम मोदींनी केले आहे. इलेक्ट्रॉरॉल बाँड देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे नाव कमी करून सर्वत्र मोदी मोदी करण्यापलीकडे देशात काहीच केले नाही. छप्पन इंची छाती सांगणारे आता 14 इंचावर आल्याचा आरोप करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन सभे करिता कुशल मेश्राम, बालमुकुंद घिरड, रमेश गजभिये, नीलेश विश्वकर्मा, डॉ . निरज वाघमारे, मिलिंद पाटील, शिवदास कांबळे, दिलीप भोयर, मोहन भवरे, रवी भगत, धम्मवती वासनिक, पुष्पा शिरसाट, संघपाल कांबळे, गौतम दारुंडे, प्रतीक मुनेश्वर, राजेश तलवारे, वैशाली गायकवाड, शरदा मेश्राम, अर्चना कांबळे, अर्चना नगराळे, प्रणिता कांबळे यांची उपस्थिती होती.

सभा यशस्वी करण्यासाठी किशोर मुन, राजू चापडे, विशाल कांबळे, सोनू दुर्गे, कपिल मेश्राम, ताई डोंगरे, नंदिनी ठमके, विनोद कोठार, मिलिंद नगराळे, कुंदन नगराळे, अंजू पासवान, अर्चना दुर्गे, सुनीता दुपारे, शंकर रामटेके, केतन रामटेके, विलास तेलतुंबडे, वसीम शेख, रोहित डोंगरे, दीपक राणा, आश्विन दुर्गे राजू गजरे, अक्षय दुपारे, शिवम खोब्रागडे यांचे सह युवा व महिला आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Rokhthok News