Home Breaking News “ताई”च्या प्रचारकाला “त्या” ग्रामस्थांने झापले..!

“ताई”च्या प्रचारकाला “त्या” ग्रामस्थांने झापले..!

● व्हिडीओ व्हायरल, उमेदवारांची झाली गोची

1959
C1 20240411 05282949

व्हिडीओ व्हायरल, उमेदवारांची झाली गोची

सुनील पाटील- वणी | लोकसभा निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांनी प्रचार यंत्रणा राबवताना आक्रमकता अवलंबली आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात महायुतीने उमेदवार आयात करून निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र “ताई”च्या प्रचारकाला “त्या”ग्रामस्थांने चांगलेच झापले. The battle for the first phase of the Lok Sabha elections has started.

अवघे काही काळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असताना महायुतीने जातीय कार्ड खेळले. हिंगोलीच्या अधिकृत उमेदवाराला विरोध होत असल्याचे कारण पुढे करून त्यांच्या सौभाग्यवतीला चक्क यवतमाळ-वाशीम ची उमेदवारी देत गड जिंकल्याचा आव आणला. त्यातच मतदारसंघाची लेक म्हणून गवगवा करण्यात येत असून “लेकी”ला दिल्लीत पाठवण्याचा चंग बांधण्यात येत आहे.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील “ती” उमेदवार याच क्षेत्रातील “लेक” आहे, तिचा यथोचित सन्मान व्हावा हीच ईच्छा सर्वसामान्य मतदारांची आहे. तिचे पती खासदार असताना याच लेकीने माहेरवाशीयांसाठी नेमके काय केले हेच कळेनासे झाले आहे. त्यांनी तो सुवर्णकाळ स्वतःचे साम्राज्य उभारण्यासाठी खर्ची घातल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. आता नाईलाजास्तव त्यांच्या पतीला डच्चू मिळाला आणि आमची लेक निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

ताईने, अवघे काही दिवस असताना प्रचार यंत्रणा राबवली आहे. काही तरुण तरुणी गावोगावी प्रचार करताहेत, त्यांनी आपली भूमिका मांडताना ताई चा परिचय देत लेकीला मतदान करण्याचे आव्हान केले आहे. यावर मतदार मात्र प्रचंड संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी सुलतानी संकटात भरडल्या जात असताना सत्ताध्याऱ्या कडून होत असलेला प्रचार खेड्यापाड्यात उधळून लावला जात आहे.
Rokhthok News