Home Breaking News बाजार समिती सभापतींची माळ कोणाच्‍या गळयात

बाजार समिती सभापतींची माळ कोणाच्‍या गळयात

● ऍड. एकरे की गारघाटे, चुरस कायम

1341
C1 20240404 14205351

ऍड. एकरे की गारघाटे, चुरस कायम

Apmc news wani | कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या 18 संचालक पदा करिताची निवडणूक काही दिवसांपुर्वी पार पडली. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार (sanjivreddi bodkurwar) यांचे गटाचे 14 उमेदवार निवडून आलेत. सभापती पदाचा कार्यक्रम कोणत्‍याही क्षणी जाहिर होणार आहे. माञ सभापतींची माळ कोणाच्‍या गळयात पडणार याची उत्‍सूकता शिगेला पोहचली असुन ऍड. विनायक एकरे की विजय गारघाटे यांचेत चुरस बघायला मिळत आहे. Whose neck is the burden of the market committee chairman?

भाजपाचे खंदे कार्यकर्ते विजय गारघाटे यांचा शिंदोला विभागात चांगलाच दबदबा आहे. त्‍यांनी पंचायत समितीचे उप सभापती पद भुषवले आहेत. तसेच पक्षीय राजकारणात त्‍यांचा विरोधक नाही. भाजपाच्‍या अंतर्गत गोटातुन गारघाटे यांचे नांव प्रबळपणे रेटल्‍या जात आहे.

सहकार क्षेञांतील बलाढय व्‍यक्‍तीमत्‍व म्‍हणुन ऍड. विनायक एकरे यांना ओळखल्‍या जाते. त्‍यांनी बाजार समितीचे सभापती पद योग्‍य पध्‍दतीने यापुर्वी हाताळले आहे. तसेच त्‍यांचे कार्यकाळात व्‍यापारी संकुलाची निर्मिती सुध्‍दा करण्‍यात आली असुन ते लिलावाच्‍या प्रतिक्षेत आहे.

ऍड. एकरे यांनी यवतमाळ जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅकेचे अध्‍यक्षपद सुध्‍दा भुषवले आहे. या निवडणुकीत त्‍यांनी भाजपाशी जवळीक साधत शेतकरी एकता पॅनल च्‍या माध्‍यमातुन प्रचार यंञणा राबवली होती. ते पुर्वाश्रमीचे कॉग्रेसी असुन आजपावेतो त्‍यांनी भाजपात रितसर प्रवेश केलेला नाही.

बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होईल असे वाटत असतानाच आ. बोदकुरवार यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवत 18 पैकी 14 उमेदवार निवडून आणलेत. सभापती पदावर कोणाची निवड करायची हे पक्षश्रेष्‍ठींच्‍या निर्णयावर अवलंबुन असणार आहे.

ऍड. एकरे हेच सभापती पदाचे उमेदवार असतील असे निवडणुकी दरम्‍यान बोलल्‍या जात होते. माञ पक्षीय राजकारणात पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांलाच पदाचा लाभ व्‍हावा असा मतप्रवाह असल्‍याने आ. संजीवरेड्डी बोदकुरवार काय भुमीका घेतात हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे.
वणी : बातमीदार