Home Breaking News दुःखद…अपघातातील जखमी तरुणाचा ‘मृत्यू’

दुःखद…अपघातातील जखमी तरुणाचा ‘मृत्यू’

1838

विठ्ठलवाडी परिसरात पसरली शोककळा

वणी: सोमवार दि. 6 जूनला सायंकाळी वरोरा येथील आत्या कडे आपल्या दुचाकीने जात असलेल्या येथील 20 वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचेवर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवार दि. 10 जूनला सायंकाळी प्राणज्योत मालवली.

ओम अनिल आगलावे (20) असे दुर्दैवी मृतक तरुणाचे नाव आहे. तो शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या आत्याच्या घरी जात असताना वरोरा मार्गावरील टोल नाक्याजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर ला हलविण्यात आले. चार दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता अखेर शुक्रवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

अपघाताचे सत्र सातत्याने सुरू आहे, अस्ताव्यस्त वाहतुकीत नाहक बळी जाताहेत. नुकताच लालपुलिया परिसरात झालेल्या अपघातात विठ्ठलवाडीतील होतकरु तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या दोन दिवसानंतर त्याच परिसरातील उमद्या तरुणाच्या झालेल्या अपघाती मृत्यूने स्थानिकांत शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार