Home वणी परिसर मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये समर कॅम्प

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये समर कॅम्प

464

13 ते 18 जून पर्यंत आयोजन

वणी :- घुग्गुस मार्गावरील निलगरी बना जवळ नव्याने सुरू होत असलेल्या मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये दि 13 जून ते 18 जून या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या विध्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहे. या सुट्यांच्या कालावधीत अनेक विध्याथी विविध कला गुणांचे प्रशिक्षण घेत असतात. मात्र वणी सारख्या ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी या पासून वंचीत राहतात.

ग्रामीण भागातीलही विद्यार्थ्यांनी विविध कला गुण आत्मसात करावे या करिता मार्कंडेय पोदार लर्न स्कूल ने 6 दिवसाच्या समर कॅम्प अत्यल्प दरात आयोजित केला आहे.

या समर कॅम्प मध्ये स्केटिंग, कराटे, नृत्य, झुंबा एरोबिक्स, कॅलिग्राफी, ड्रॉईंग, आर्ट अँड क्राफ्ट, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण, संगीत, मेहंदी व संगणकाचे प्रशिक्षण तज्ञ शिक्षकां कडून देण्यात येणार आहे.

सकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यत चालणाऱ्या या समर कॅम्पमध्ये 3 ते 11 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू आहे. इच्छुक पालकांनी प्रवेशासाठी 8999467922, 9579994672, 7820805742, या क्रमांकावर सम्पर्क साधण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.