Home वणी परिसर शहरात पाणी पेटले….पंधरा दिवसांपासुन पाणी टंचाई

शहरात पाणी पेटले….पंधरा दिवसांपासुन पाणी टंचाई

● मनसे तहान भागविण्याकरीता मैदानात

548

● मनसे तहान भागविण्याकरीता मैदानात

MNS NEWS WANI : शहरात पंधरा दिवसापासुन पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरीक कासाविस झालेले असतांनाच महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पुन्‍हा नव्‍या दमाने धावून आली आहे. शहरातील काही प्रभागात टॅकरव्‍दारे पाणी पुरवठ्याचा सपाटा लावला असुन लोकप्रतिनिधी माञ मुग गिळून गप्‍प का ? असा प्रतिप्रश्‍न राजु उंबरकर यांनी उपस्थित केला आहे. Maharashtra Navnirman Sena has come running again with renewed vigor when the citizens are exhausted.

वणीकर नागरीकांची तृष्‍णा भागविण्‍यासाठी सातत्‍याने महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना अग्रेसर असते. जेव्‍हा जेव्‍हा पाणी टंचाईने नागरीक होरपळतात तेव्‍हा मनसे स्‍वखर्चाने शहरातील नागरीकांची तहान भागविण्‍याची जबाबदारी उचलत असल्‍याचे नाकारता येत नाही. शहरात मागील पंधरा दिवसापासुन पाणी टंचाईच्‍या झळा स्‍थानिकांना सोसाव्‍या लागत आहे.

वणी शहराला दररोज तब्बल पन्नास लाख लिटर पाण्याची गरज आहे़. पाणी पुरवठा योग्‍यरित्‍या व नियमीत व्‍हावा याकरीता तात्‍कालीन सत्ताधाऱ्यांनी महत्‍वाकांक्षी पाणीपुरवठा योजना अमलात आणली होती. त्‍यासाठी शासनस्‍तरांवरुन निधीची उपलब्‍धता करण्‍यात आली तर वर्धा नदीवरील रांगणा- भुरकी घाटातुन पाणी पुरवठा करण्‍यात येतोय, काही वर्ष नियमीत पाणी पुरवठा करण्‍यात आलेला असतांनाच त्‍या योजनेला आता “घरघर” लागल्‍याचे दिसत आहे.

शहरातील बहुतांश प्रभागात पाणी टंचाईचे चटके महिलांना सोसावे लागत आहे.  विठ्ठलवाडी, प्रगतीनगर, ढुमे नगर, गुरु नगर, आनंद नगर, देशमुख वाडी,  कनकवाडी, जैन ले- आऊट, साने गुरुजी नगर, मोमीन पुरा तसेच शहरातील अन्य भागातील नागरीकांना दोन- तीन दिवसाआड होत असलेल्‍या पाणी पुरवठ्यामुळे महिलांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. यामुळेच मनसेने टॅकर व्‍दारे पाणी पुरवठा सुरु केला असुन नागरीकांनी मनसे कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.

लोक प्रतिनिधीमुळेच कृञीम पाणी टंचाई

raju umbarkar
raju umbarkar

शहरातील नागरीकांची तहान भागविण्‍यात येथील लोक प्रतिनिधी सपशेल अपयशी पडले आहेत. पालीका प्रशासनावर त्‍यांचा वचक नसल्‍याने नागरीकांना मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. महत्‍वाकांक्षी योजनेचा बोजवारा का उडाला हे तपासणे गरजे असुन त्‍या योजनेलाच “वाळवी” लागली नाही ना हा संशोधनाचा विषय झाला आहे.

राजु उंबरकर
नेते, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना

Previous articleफरार सराईत चोरटा “गब्‍या” अखेर ‘जेरबंद’
Next articleArms : धारदार तलवारीसह तरुण अटकेत
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.