Home वणी परिसर कुंभा येथे रक्‍तदान शिबिर

कुंभा येथे रक्‍तदान शिबिर

182

80 रक्‍तदात्‍यांनी पार पाडले कर्तव्‍य

मारेगांव तालुक्‍यातील कुंभा येथील विजयालक्ष्‍मी दुर्गोत्‍सव मंडळ दरवर्षी विविध सामाजीक उपक्रम राबवित असतात. यावर्षी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी तब्‍बल 80 व्‍यक्‍तींनी रक्‍तदान केले.

नवराञोत्‍सवात नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते. सामाजिक उपक्रम राबविण्‍यात येतात. कुंभा येथील विजयालक्ष्‍मी दुर्गोत्‍सव मंडळाच्‍या वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी परिसरातील अनेक मान्‍यवर प्रामुख्‍यांने उपस्थित होते. राजकीय हेवेदावे बाजुला ठेवत कार्यक्रमांची सांगता करण्‍यात आली. याप्रसंगी 80 रक्‍तदात्‍यांनी आपले कर्तव्‍य बजावले.