Home Breaking News poison : तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू

poison : तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू

● विष प्राशन करून संपवले जीवन

1394
C1 20231211 16462087
C1 20240404 14205351

विष प्राशन करून संपवले जीवन

Sad News Wani : आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे फार स्वस्त झाले आहे. झरी तालुक्यातील सुर्ला या गावात वास्तव्यास असलेल्या 34 वर्षीय तरुणाने विषाचा घोट पोटात रिचवला. त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार दिनांक 11 डिसेंबरला सकाळी घडली. The name of the young man who consumed the poisonous liquid is Ajay Namdev Kodape (34).

अजय नामदेव कोडापे (34) असे विषारी द्रव प्राशन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह सुर्ला या गावात वास्तव्यास होता. सोमवारी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरीच विषाचा घोट पोटात रिचवला. ही बाब त्याच्या आईला समजल्यावर त्यांनी आरडाओरडा केला.

अजयच्या आईचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारीपाजारी जमा झाले. त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी मारेगाव पोलीस पुढील तपास करत आहे.
Rokhthok News

Previous articleट्रकवर दुचाकी आदळली, तरुण ठार
Next articleभरधाव पिकअप वाहनाने मजूर महिलांना उडवले
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.