Home Breaking News त्या….पीडितेने गळफास लावून जीवनयात्रा ‘संपवली’

त्या….पीडितेने गळफास लावून जीवनयात्रा ‘संपवली’

1545

आत्महत्येचे कारण तपासाअंती होणार स्पष्ट !

वणी: मागील महिन्यात लग्नाचे आमिष व वारंवार लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अल्पवयीन बालिकेने घरा शेजारी राहणाऱ्या तरुणा विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्या…पीडितेने शनिवार दि. 12 फेब्रुवारी ला आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळी उघडकीस आली.

अल्पवयीन पीडिता शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे वास्तव्यास होती. ती आई व भावा सोबत आजोबा कडे राहत होती. भावाचा 21 वर्षीय मित्र नेहमी घरी येत असल्याने त्यांच्यात ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि जवळीक वाढली.

त्या दोघात प्रेम संबंध प्रस्थापित झाले, लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने ‘तो’ शारिरीक शोषण करू लागला. जेव्हा हवं तेव्हा तिचा उपभोग घेत होता. त्यातच ‘तो’ जबरदस्ती करायला लागला. घटनेच्या दिवशी दि. 10 जानेवारीला रात्री 9 वाजता तो पुन्हा पीडितेच्या घरी पोहचला आणि बळजबरी करत ‘तिला’ मारहाण केली. या प्रकाराने भेदरलेल्या परिवाराने वणी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

वणी पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि भादंवि च्या कलम 376 (2) (3) (J)(N), 452, 323, 506 व सहकलम 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. परंतु घडलेल्या घटनेच्या तब्बल एक महिन्यानंतर पीडितेने गळफास लावून आत्महत्या केल्याने विविध प्रश्न उभे ठाकले आहे.

शनिवारी घरी कोणीच नसल्याची संधी साधून पीडितेने घरातच गळफास घेतला. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. तात्काळ पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रुग्णालयात पाठवला. परंतु पीडितेने हा टोकाचा निर्णय का घेतला या बाबतचे सत्य तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार