Home Breaking News ‘लायन्स’ च्या दोन्ही संघाचे नेत्रदीपक यश

‘लायन्स’ च्या दोन्ही संघाचे नेत्रदीपक यश

315
C1 20240404 14205351

राज्यस्तरीय विभागासाठी पात्र

रोखठोक | शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने आयोजीत अमरावती विभागस्तरीय टेनीस क्रिकेट स्पर्धेत लॉयन्स इंग्लीश मिडियम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या 14 वर्षा खालील (मुली), व 17 वर्षा खालील (मुली) च्या दोनही संघाने अंतिम सामने जिंकुन नेत्रदीपक यश प्राप्त केले. यामुळे दोन्ही संघ राज्यस्तरीय विभागासाठी पात्र ठरले आहेत.

विभागस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा दि.6 व 7 फेब्रुवारी ला मेहकर क्रिडा संकुल (बुलढाणा) येथे पार पडल्या, रोमांचकारी ठरलेल्या अंतीम सामन्या मध्ये लायन्स इंग्लीश मिडियम स्कुलच्या संघाने अमरावतीच्या चमुला पराजीत करूण विजय प्राप्त केला.

14 वर्षा खालील (मुली) च्या संघात स्वरा करंडे (कर्णधार), स्वरा धोपटे, श्रावणी काळे, श्रेया मोहुर्ले, भाविका हेपट, संस्कृती केळकर, सुजाता काळे, तनुष्का पिसे, मुस्कान जैन, मानवी कटारीया, अनोखी केमेकर, त्रिशा तर 17 वर्षा खालील (मुली) च्या संघात त्रिप्ती निषाद (कर्णधार), मृणाल वैद्य, अनघा ऐकरे, आकांशा निकुंबे, सृष्टी खाडे, लक्ष्मी नक्षीणे, सुहानी काळे, रिया लोखंडे, श्रध्दा आस्कर, प्रियंका जांगीड, संधर्वी पुसाटे, भुमिका बदखल, सावंगी काकडे यांचा समावेश होता.

लायन्स इंग्लीश स्कुलची चमू राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करणार असुन त्यांच्या यशाबद्दल विजयी खेळाडुचे व क्रिडा प्रशिक्षक अविनाश उईके यांचे संस्थेचे अध्यक्ष शमीम अहमद, उपाध्यक्ष डॉ. के. आर. लाल, सचिव महेंद्र श्रीवास्तव, कोषाध्यक्ष रमेश बोहरा, संचालक डॉ. आर. डी. देशपांडे, सुधीर दामले, सी. के. जोबनपुत्रा, बलदेव खुंगर, राजाभाऊ पाथ्रडकर, मंजिरी दामले, प्राचार्य प्रशांत गोडे व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.
वणी: बातमीदार