Home Breaking News  तर…त्‍या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्र धोक्यात..!

 तर…त्‍या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्र धोक्यात..!

● वणीतील मॅकरूनची प्राथमिक शाळाच अनधिकृत ! ● CBSE शाळा चक्‍क टिनाच्‍या शेड मध्‍ये

1220
C1 20240212 19074168
Img 20240613 Wa0015
 वणीतील मॅकरूनची प्राथमिक शाळाच अनधिकृत !
CBSE शाळा चक्‍क टिनाच्‍या शेड मध्‍ये

Education News : तालुक्यातील वडगाव टीप येथे मॅकरून स्टुडंट अकादमी ही प्राथमिक आणि माध्यमिक CBSE शाळा सुरू होती. अॅफीलेशन (Affiliation) परवाना तालुक्‍यातील वडगांव टीप येथील असतांना वर्ग 1 ते 4 प्राथमिक शाळा वणी शहरात अगदी बिअर शॉपीच्‍या लगत हलवली. शासनाची रीतसर परवानगी नसल्याने ती शाळा अनधिकृत ठरवल्या जाते. यामुळे प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्र धोक्यात आले आहे. The primary school was moved to Wani town right next to the beer shop.

कोणतीही शाळा स्थलांतरित करायची असेल तर शासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. राज्य शासनाकडे प्रस्‍ताव सादर करुन चेंज रिपोर्ट घ्‍यावा लागतो. त्‍यानंतर जिथे शाळा स्‍थलांतरीत करायची आहे तेथील नगर पालीका अथवा ग्रामपंचायतच्‍या सक्षम अधिकाऱ्याकडून जागे बाबत अटी शर्तीच्या अधिन राहुन ना हरकत घ्‍यावी लागते. त्या नंतरच प्राथमिक अथवा माध्यमिक वर्ग स्थलांतरित करावे लागते. तसं केलेलं नसेल तर ती शाळा अनधिकृत म्हणून शासन घोषित करतात.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडंट अकादमी ही CBSE शाळा तालुक्यातील वडगाव टीप हद्दीत चालविण्यात येते. शाळेला CBSE बोर्डाचा संलग्नता (Affiliation) परवाना वडगांव टिप येथील आहे. विध्‍यार्थ्‍यांची अधिक पटसंख्‍या मिळावी याकरीता मागील शैक्षणिक सञापासुन प्राथमिक वर्ग 1 ते 4 वणी वरोरा मार्गावरील गंगशेटटीवार मंगल कार्यालयाजवळ स्‍थलांतरीत करण्‍यात आले आहे. शाळा स्‍थलांतरीत करण्‍यापुर्वी संस्‍था चालकांनी महाराष्‍ट्र शासनाच्‍या शिक्षण विभागाकडून चेंज रिपोर्ट घेणे अनिवार्य होते. तसेच जिथे शाळा स्‍थलांतरीत करायची त्‍या जागेची नाहरकत पालीका प्रशासनाकडून घेणे अभिप्रेत होते.

इमारती बाबत नियमांची एैसीतैसी
शासनाने CBSE शाळेच्‍या इमारतीबाबत नियमांवली केलेली आहे यामध्‍ये भौतीक सोयी सुविधेच्‍या उपलब्‍धते बाबत सुचविण्‍यात आले आहे. शाळेची पक्‍की इमारत rcc बिल्‍डींग असावी असा नियम असतांना एकता नगर वणी परिसरातील 1 ते 4 पर्यंतची इंग्रजी माध्‍यमाची मॅकरुन शाळा चक्‍क टिनाच्‍या शेड मध्‍ये आहे.  CBSE  बोर्डाच्‍या नियमांचे तंतोतंत पालन शाळा करते की नाही याची खातरजमा पालकांनी करणे गरजेचे झाले आहे.

पालीकेने जागेबाबत noc दिलेली नाही
एकता नगर परिसरात सुरु असलेल्‍या इंग्रजी माध्‍यमाच्‍या मॅकरुन इंग्‍लीश मिडीयम शाळेला नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन जागेबाबत ना हरकत ( NOC )देण्‍यात आलेली नाही. यामुळे तसा अभिप्राय पालीका प्रशासनाच्‍या वतीने शिक्षण विभागाला देण्‍यात येणार आहे. तसेच कारवाई बाबतचा अधिकार शिक्षण विभागाला आहे.
गिरीधर चवरे
प्रशासन अधिकारी शिक्षण
नगर पालीका वणी

C1 20240529 15445424