Home वणी परिसर स्वर्णलिला शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

स्वर्णलिला शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

936

16 विध्यार्थी गुणवत्ता यादीत

वणी :- येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलच्या 10 वी च्या विद्यार्थ्यांनी टर्म 1च्या बोर्ड परीक्षेत भरभरून सुयश प्राप्त केले.

प्रेक्षा लोकेश छाजेड होने 200 पैकी 200 गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. महेक अजय लाल व ओम मनोज आकुलवार यांनी 200 पैकी 198 गुण मिळविले आहे. एकुण 108 विद्यार्थ्यां पैकी 16 विदयार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले असुन शाळेचा 100 टक्के निकाल लागला. शाळेचे अध्यक्ष डॉ. नरेद्र रेड्डी यांनी विध्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या विदयार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व पालक यांना दिले आहे.
वणी : बातमीदार