Home Breaking News प्राथमिक आरोग्‍य केंद्राचा कारभार ‘ढेपाळला’

प्राथमिक आरोग्‍य केंद्राचा कारभार ‘ढेपाळला’

● सुधारणा करा अन्‍यथा... मनसेचा ईशारा

635

सुधारणा करा अन्‍यथा… मनसेचा ईशारा

रोखठोक | उपविभागतील आरोग्‍य व्‍यवस्‍थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची वानवा, OPD ची अनागोंदी असा आरोप करत मनसेचे तालुका प्रमुख फाल्‍गून गोहोकार यांनी शिरपुर प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी THO यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. The condition of primary health center has become very bad. Shortage of medicines is known continuously

शिरपुर प्राथमिक आरोग्‍य केंद्राची अवस्‍था अतिशय बिकट झाली आहे. औषधांचा तुटवडा सातत्‍याने जानवतो तसेच रेबीज ची लस सुध्‍दा उपलब्‍ध नसल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. गंभीर रुग्‍ण तथा गर्भवती महिलांना पुढील उपचारासाठी हलविण्‍यात आल्‍यास रुग्‍ण वाहिका उपलब्‍ध करुन देण्‍यात येत नसल्‍याने निवेदनातुन संताप व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

OPD वेळेत सुरु करावी, औषधीचा साठा तात्काळ भरावा,  108 रुग्ण वाहिका त्वरित देण्यात यावी अशा मागण्‍या निवेदनातुन रेटून धरण्‍यात आल्‍या आहेत. आठ दिवसात सर्व प्रश्‍नाची सोडवणूक करावी अन्‍यथा तिव्र आंदोलन छेडण्‍यात येईल असा इशारा देण्‍यात आला आहे.

याप्रसंगी शिवराज पेचे,  चंद्रशेखर पाचभाई, अंकुश ननकटे,  जहरुल शेख, गजानन दगडी, नैशद ठमके, गौरव सोनटक्‍के, सुरज काकडे, प्रविण खोबरे, प्रविण गीरोले, राहुल पचारे, पवन घोंगे यांचेसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार