Home वणी परिसर आर्य वैश्य समाज सभागृहाचे भूमिपूजन

आर्य वैश्य समाज सभागृहाचे भूमिपूजन

830

माता वासवी कन्यका परमेश्वरी प्रकट दिन उत्साहात

वणी: माता वासवी कन्यका परमेश्वरी प्रकट दिनाचे औचित्य साधून आर्य वैश्य समाजाच्या वतीने दि. 11 मे ला प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून मिरवणूक काढण्यात आली तर येथील वसंत गंगा विहार परिसरात भव्य आर्य वैश्य समाज सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष राजेश झिलपिलवार हे होते तर प्रमुख उपस्थिती समाजाचे जेष्ठ विजय मुकेवार ,समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत गुंडावार व महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना गंजीवार ,युथ आघाडीचे अध्यक्ष सुरेंद्र नालमवार यांची होती.

याप्रसंगी आ. बोदकुरवार यांनी सभागृहाच्या वॉल कंपाऊंड बांधकामासाठी रुपये 15 लक्ष देण्याचे जाहीर केले. तर झिलपिलवार यांनी नागपूर येथील मनोज गोलावार यांनी समाज भवनाला 4200 फूट जागा दान दिल्या बद्दल विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनेश गुंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय कोडगिरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारिणी सदस्य व समाज बांधवांनी सहकार्य केले.
वणी: बातमीदार