Home वणी परिसर बारावीत जिल्ह्यातून ‘श्रेया’ अव्वल

बारावीत जिल्ह्यातून ‘श्रेया’ अव्वल

● स्वर्णलीला ची यशस्वी परंपरा कायम

2365
C1 20240404 14205351

स्वर्णलीला ची यशस्वी परंपरा कायम

Education news wani |: केंद्रीय शिक्षण मंडळाने बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल ने यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. बारावीत श्रेया ओम चव्हाण (ठाकूर) हिने 95.06 टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान पटकावला. The Central Board of Education declared the results of class 12th online. Swarnalila International School here has maintained a successful tradition.

केंद्रीय शिक्षण मंडळाने दि. 12 मे ला बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे. यामध्ये स्वर्णलीला शाळेची श्रेया ओम ठाकूर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. श्रेयाने इंग्रजी या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे. कोणतीही शिकवणी वर्ग न लावता तिने यशाला गवसणी घातली आहे.

स्वर्णलीला शाळेच्या नऊ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. यामध्ये राधिका ठाकरे- 93:08, साहिल पावडे- 88:02 टक्के गुण प्राप्त करून शाळेतून द्वितीय व तृतीय आले आहेत. त्यांच्या या यशाचे शाळेचे संचालक डॉ. व्ही. नरेंद्र रेड्डी, प्राचार्या डॉ. सौजन्या यांनी कौतुक केले आहे.
वणी: बातमीदार