Home Breaking News थरार…पत्रकारावरच चोरट्यांचा रॉड ने ‘हल्ला’

थरार…पत्रकारावरच चोरट्यांचा रॉड ने ‘हल्ला’

2236
C1 20240404 14205351

गाडगेबाबा चौक परिसरातील घटना

तुषार अतकारे | शहरात चोरटे चांगलेच सक्रिय झाले असे सकृतदर्शनी दिसत असले तरी प्रशासन मात्र सुस्तवलेले आहेत. बुधवार दि. 12 ऑक्टोबर ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास गाडगेबाबा चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रतिथयश वृत्तपत्रातील पत्रकाराच्या घरी चोरी केली आणि रॉड ने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

आसिफ शेख (52) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह गाडगेबाबा चौक परिसरात वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी ते आपल्या निवासस्थानी खालील घर कुलूपबंद करून वरच्या मजल्यावर झोपले होते.

घरात कोणीच नसल्याचे गृहीत धरून चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील 15 हजाराची रोकड ताब्यात घेवून वरच्या मजल्यावर चोरी करण्याच्या उद्देशाने पायऱ्या वरून वर चढत होता. त्याचवेळी मॉर्निंग वॉक करिता खाली उतरत असलेले आसिफ शेख समोरासमोर आले आणि चोरट्याने क्षणाचा विलंब न करता डोक्यात रॉड हाणला.

या घटनेत आसिफ शेख गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्यावर मोठी जखम झाली आहे. प्रकृती स्थिर असली तरी पुढील उपचारार्थ त्यांना नागपूर ला हलवण्यात येणार आहे. ही घटना कळताच SDPO, ठाणेदार यांनी खाजगी रुग्णालयात भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. घटनेतील आरोपी गब्ब्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वणी: बातमीदार