Home Breaking News दुःखद…15 महिन्याच्या बालकाचा टाक्यात बुडून मृत्यू

दुःखद…15 महिन्याच्या बालकाचा टाक्यात बुडून मृत्यू

3263

● आंनद नगरात शोककळा

वणी : आंगणात खेळतांना खोल असलेल्या पाण्याच्या टाक्यात बुडून 15 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि 13 मार्चला सकाळी 11 वाजताचे सुमारास घडली. बालकाच्या या दुर्दैवी मृत्यूने आंनद नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

रुदय श्रीराम गोवारदिपे असे बालकाचे नाव आहे. श्रीराम गोवारदिपे हे आपल्या परिवारासह आनंद नगर येथे राहतात. त्यांना रुदय हा 15 महिन्याचा मुलगा आहे. रविवारी सकाळी रुदय आंगणात खेळत होता तर त्याची आई कपडे धूत होती.

आंगणात खेळता खेळता पाण्याने भरलेल्या टाक्यात तोल गेल्याने तो पडला. काही वेळाने त्याचा काका घरी आला असता रुदय पाण्यात तरंगतांना दिसला. त्याला लगेच खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रुदय च्या मृत्यूने गोवारदीपे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वणी: बातमीदार