Home Breaking News विषाचा घोट…तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

विषाचा घोट…तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

● आत्महत्येचे कारण अस्पष्ट

1147
C1 20240313 21110598

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Sad News Wani | तालुक्यातील सेलु (खुर्द) येथे वास्तव्यास असलेल्या 39 वर्षीय शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन करून जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवार दिनांक 13 मार्चला उघडकीस आली. त्याने मृत्यूला का कवटाळले हे स्पष्ट होवू शकले नाही. A 39-year-old farmer went to the farm and ended his life by ingesting poisonous liquid.

संदीप गोपीचंद आवारी (39) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह सेलु (खुर्द) येथे राहत होता. त्याचे व मोठा भाऊ श्रीकृष्ण यांचे नावे असलेली शेत जमीन कसून तो आपल्या परिवाराचा गाडा हाकत होता.

घटनेच्या दिवशी दुपारी 12 वाजता नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सायंकाळी पाच वाजतापर्यंत ते घरी परतले नाही तसेच ते जेवायला सुध्दा आले नाही. यामुळे घरची मंडळी शेतात गेली तर त्यांना ते मृतावस्थेत दिसले.

घाबरलेल्या नातेवाईकांनी याबाबत तातडीने पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. संदीप च्या आत्महत्येने परिवारावर शोककळा पसरली असून त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News