Home क्राईम sharp sword in his hand, धारदार तलवार हाती नाचवत घातला ‘घुमाकुळ’

sharp sword in his hand, धारदार तलवार हाती नाचवत घातला ‘घुमाकुळ’

● राजूर कॉलरी परिसरातील घटना

1090

राजूर कॉलरी परिसरातील घटना

रोखठोक | तालुक्यातील राजूर कॉलरी येथे दुपारच्या सुमारास 21 वर्षीय तरुण धारदार तलवार हाती नाचवत धुमाकूळ घालत होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार दि 13 एप्रिल ला सायंकाळी करण्यात आली. He danced with a sharp sword in his hand. On getting information about this, the police detained him.

त्रिशांत कवडु शाव (21) असे ताब्यातील तरुणाचे नाव आहे. तो राजूर कॉलरी परिसरातील निवासी आहे. तो घटनेच्या दिवशी दुपारी पितळेची मूठ असलेली धारदार तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करत होता. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली.

पोलिसांनी प्रतिबंधक आदेशाचे पालन करत तडक घटनास्थळ गाठले. आरोपीला ताब्यात घेत धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. तसेच त्याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बंसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO संजय पुजलवार, ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात, डी.बी पथकाचे API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, हरीन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, पुरूषोत्तम डडमल, शंकर चौधरी, सागर सिडाम यांनी केली.
वणी: बातमीदार