Home Breaking News जाहीर सभेत डागणार विरोधकांवर “तोफ”

जाहीर सभेत डागणार विरोधकांवर “तोफ”

● मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ फडणवीस वणीत

553
C1 20240413 12025822

मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ फडणवीस वणीत

Political News | चंद्रपुर- वणी- आर्णी लोकसभेची निवडणुक पहिल्‍या टप्‍प्‍यात होत आहे. स्‍टार प्रचारकांची फौज भाजपाने तैनात केली आहे तर सिनेस्‍टार सुध्‍दा हजेरी लावणार आहेत. रंगतदार वळणावर आलेल्‍या निवडणुक रणसंग्रामात भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ उपमुख्‍यमंञी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शनिवारी सायंकाळी पाच वाजता येथील शास‍कीय मैदानावर होणार आहे. devendra Fadnavis campaigning for sudhir Mungantiwar.

महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नुकतीच चंद्रपुरात झाली आहे. स्‍टार प्रचारकांच्‍या सभेमुळे वातावरण निर्मिती होत असतांनाच मतदारांपर्यंत पक्षाचा अजेंडा पोहचविण्‍यात येतो. प्रामुख्‍याने विकासाचा मुद्दा घेवून भाजपा प्रचार यंञणा राबवितांना दिसत आहे.

प्रचार यंञणेत बोदकुरवार सरस

C1 20240413 12111680
आ. बोदकुरवार प्रचार करताना

वणी विधानसभा मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना मताधिक्‍य मिळवुन देणारच अशी भिष्‍म प्रतिज्ञा आ. संजीवरेडडी बोदकुरवार यांनी केली आहे. मागील नऊ वर्षात मतदारसंघात केलेल्‍या विकासाचा पाढा गावागावात, कट्टयावर व पारावर प्रचार करतांना वाचून दाखविल्‍या जात आहे. मतदारांनी विकासाला मत दयावं अशी गळ घालण्‍यात येत असुन प्रचार यंञणेत बोदकुरवार सध्‍यस्थितीत सरस आहेत.
Rokhthok News