Home वणी परिसर दहावीत “सार्थक” चे प्रयत्‍न सार्थकी,  कौतुकांचा वर्षाव

दहावीत “सार्थक” चे प्रयत्‍न सार्थकी,  कौतुकांचा वर्षाव

● MACROON शाळेची यशस्वी परंपरा कायम

560

MACROON शाळेची यशस्वी परंपरा कायम

Education news wani | केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी MACROON STUDENTS ACADEMY शाळेने यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी दहावीत सार्थक वरारकर याने 97.60 टक्के गुण प्राप्त करत शैक्षणीक प्रयत्‍न सार्थकी लावले यामुळे त्‍याचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Macaroon Students Academy School has maintained a successful tradition

नुकताच केंद्रीय शिक्षण मंडळाने दि. 12 मे ला दहावी व बारावीचा ऑनलाईन निकाल Online Result जाहीर केला आहे. यामध्ये मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी शाळेच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. CBSE सी.बी.एस ई. ने आखुन दिलेल्या नियमानुसार मॅकरुन स्टुडन्टस अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षी ची 100 टक्के  निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

मॅकरून शाळेच्या सार्थक वरारकर (97.06), डींकी शुगवानी (95.02), सक्षम साहू (94.06), योगेश पिंपळकर (95), विवेक खिरटकर (95), आर्या काटकर  (94.04), रफिया रहमान (94.08), अनघा बोढे  (94.06) अदिती येवले (90), आदित्य माहुरे (94.06), वंश ठाकरे (94.04), शर्वरी बोढके (94.03)टक्के गुण प्राप्त करत या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

मॅकरुन स्टुडंन्टस अकादमी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राप्‍त केलेले यथ अतुलनिय असुन सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक पी.एस.आंबटकर, उपसंचालक पियूष आंबटकर,  प्राचार्या शोभना व शिक्षकवृंदानी कौतुक केले आहे.
वणी: बातमीदार