Home Breaking News “जिणेशा” दहावीत तर “ओम” बारावीत अव्वल

“जिणेशा” दहावीत तर “ओम” बारावीत अव्वल

● स्वर्णलीलाची यशस्वी परंपरा कायम

1877
C1 20240513 19130959

स्वर्णलीलाची यशस्वी परंपरा कायम

Wani News :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. यात दहावीत जिणेशा महेंद्र लोढा हिने 97.40 तर बारावीत ओम मनोज आकुलवार याने 94.40 टक्के गुण प्राप्त करत अव्वल येण्याचा मान पटकावला. Jinesha Mahendra Lodha scored 97.40 in class 10th and Om Manoj Akulwar in class 12th secured 94.40 percent marks.

नुकताच केंद्रीय शिक्षण मंडळाने दि. 13 मे ला दहावी व बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे. यामध्ये स्वर्णलीला शाळेचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊन सी.बी.एस ई. नी आखुन दिलेल्या नियमानुसार स्वर्णलीला शाळेच्या  विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षीची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेतील  28 विध्यार्थ्यांनी  90 टक्के पेक्षाही अधिक गुण मिळवून भरघोस यश संपादन केले. आर्या शिरीष कुमरवार 96.40, सानवी राम बदकी 95.40, वेदिका शंकर झिलपे 92.40 या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

स्वर्णलीला शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि इथला प्रत्येक विद्यार्थी या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक डॉ नरेंद्र रेड्डी व शिक्षकांना देतात.
Rokhthok News

Previous articleनानाजी ताजणे यांचे निधन
Next articleसुशगंगा पब्लिक स्कूलचे दणदणीत यश
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.