Home Breaking News अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

581

कुर्ली येथील घटना

तुषार अतकारे: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कुर्ली येथे अंगावर वीज पडून 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि 13 ऑक्टोबर ला सायंकाळी सहा वाजता च्या सुमारास घडली.

विशाल मारोती गायकवाड (32)असे त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे तो कुर्ली येथील निवासी होता. विशाल हा नेहमीप्रमाणे शेतात गेला होता सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला व पावसाला सुरुवात झाली. म्हणून तो शेतातील झाडाखाली आडोशाला उभा असताना अचानक वीज पडली.

विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, ही बाब लगतच्या शिवारातील शेतकऱ्यांना कळताच त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठवला. मृतकाच्या पाश्चात्य पत्नी, दोन लहान मुले व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.
वणी: बातमीदार