Home Breaking News ठाणेदारांची पोलीस अधिक्षकांनी केली पाठराखण

ठाणेदारांची पोलीस अधिक्षकांनी केली पाठराखण

1152

पत्रकारावरील हल्ल्याचे तिव्र पडसाद

रोखठोक | शहरात पत्रकारावर चोरट्याने प्राणघातक हल्‍ला केला. याघटनेनंतर शहरातील सर्व पत्रकार संघटना एकवटल्‍या. वरिष्ठांना निवेदने देण्यात आली, त्या हल्ल्याचे तिव्र पडसाद उमटत असतांना एसपींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी कमालीचा रोष व्‍यक्‍त केला. पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी मात्र ठाणेदारांची पाठराखण करत थेट ठाणेदार बदलण्‍यासाठी पञकारांनी सुपारी घेतल्‍याचे वक्‍तव्‍य केल्‍याने पञकार संघटना आक्रमक झाल्‍या आहेत.

वणी शहरात मागील काही दिवसांपासुन चोरीचे सञ सातत्‍याने सुरु आहे. पोलीस यंञणा निष्‍क्रीय झाल्‍याचे चिञ निर्माण झालेले असतांना ठाणेदार माञ आपलेच हित साध्‍य करतांना दिसत आहे. गुन्‍हे दडपण्‍याचा प्रकार वाढला हे वास्‍तव नाकारता येत नाही. घरफोड्या, दुचाकी चोरी, जुगार, मटका, कोंबड बाजार, सुगंधीत तंबाखुची होणारी आयात,  कोळसा चोरी,  फसवणूक आणि घडणाऱ्या घटना घडामोडी बाबत नाममाञ कारवाई हेच एकमेव सुञ ठाणेदार अवलंबत असल्‍याने शहरात कमालीचा रोष निर्माण होत आहे.

ठाणेदार रामकृष्ण महल्ले रुजु झाल्‍यापासुन मेरीट मुळेच हे ठाणे मिळाल्‍याचा आव आणत आहे. शहरातील सामाजीक कार्यकर्ते, गाव पुढारी, दक्षता समितीचे सदस्‍य, पत्रकार, पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला सदैव मदत करणाऱ्या सोबत समन्‍वय साधण्‍यात त्‍यांना आलेले अपयश आणि तपासातील त्‍यांची कार्यप्रणाली बघता नेमके त्‍यांच्‍यातील मेरीट काय असा प्रश्‍न वणीकर नागरीकांसमोर उपस्थित होत आहे.

पञकारावर चोरट्याने केलेला हल्‍ला अतिशय गंभीर स्‍वरुपाचा आहे. याप्रकरणी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीअमरावती दौऱ्यावर असलेल्या उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना वणी शहरात पोलीस प्रशासनाची ढेपळलेली परिस्थिती कथन करून पत्रकारांनी दिलेले निवेदन सादर केले.

वणीत डॉ. भुजबळ यांनी पत्रकारासोबत संवाद साधतांना शहरातील गुन्हयाबाबत केलेलं तुलणात्‍मक व संख्‍यात्‍मक आकलण केले. यावेळी सादर केलेली आकडेवारी कागदोपञी असतं हे सर्वसामान्‍य नागरीकांना कळतं. हा आलेख सांगण्‍याची गरज जिल्‍हा पोलीस अधिक्षकांना का वाटली असा प्रश्‍न उपस्थित होत असुन झालेल्‍या हल्‍ल्‍या बाबत व आरोपीला पकडण्याच्या रणनिती बाबत साधा ‘ब्र’ सुध्‍दा काढला नाही.

सातत्‍याने शहरात गुन्‍हयांचा आलेख वाढत आहे. मागील काही महिन्‍या पासुन चोरीच्‍या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. थातुरमातुर चोरी प्रकरणात गुन्‍हे सुध्‍दा नोंद करयात येत नाहीत. दुचाकी चोरीच्‍या घटना दररोज घडत असतांना गुन्‍हे नोंदविण्‍यात येत नसल्‍यांची खंत नागरीक व्‍यक्‍त करीत आहे. गुन्‍हयाची तिव्रता कमी करुनच गुन्‍हे नोंदविल्‍या जात असल्‍याचे वास्‍तव नाकारता येत नाही. त्‍यातच तपास यंञणा कमालीच्‍या ढेपाळल्‍या आहेत. अद्याप चोरीच्‍या घटनेतील आरोपी पोलीसांच्‍या गळाला लागला नाही हे कशाचे ध्‍योतक समजावे.

ठाणेदारांनी डॉक्‍टरला मागीतले पाच लाख रुपये..!
जिल्‍हा पोलीस अधिक्षक पञकारांसोबत संवाद साधत असतांना डॉ महेंद्र लोढा यांनी दक्षता भवनात अचानक उपस्थिती दर्शवत त्‍यांच्‍यावर झालेला अन्यायाचा पाढाच वाचला. अल्‍पवयीन बालीकेच्‍या गर्भपात प्रकरणी झालेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी ठाणेदार रामकृष्ण महल्‍ल्‍ेा यांनी चक्क पाच लाख रुपयांची मागणी केल्‍याचा आरोप डॉ. लोढा यांनी करून एकच खळबळ उडवून दिली.

मुख्यमंत्र्यांना नारायण गोडे यांनी दिले निवेदन
सामाजीक कार्यकर्ते नारायण गोडे हे मुंबईला गेलेले असतांना त्‍यांना पञकारावरील हल्‍याची बातमी समजली. त्‍यांनी तात्‍काळ मंञालय गाठून थेट मुख्‍यमंञी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि वणी शहरात माजलेल्‍या अनागोंदी बाबत विस्तृत चर्चा करत अकार्यक्षम ठाणेदारांची तात्‍काळ उचलबांगडी करावी अशी मागणी केली आहे.
वणी: बातमीदार