Home Breaking News Accident….दोन दुचाकी आपापसात भिडल्या, दोघे जखमी

Accident….दोन दुचाकी आपापसात भिडल्या, दोघे जखमी

● भाटिया कोल वॉशरी जवळची घटना

2045

भाटिया कोल वॉशरी जवळची घटना

रोखठोक | शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान यवतमाळ मार्गावरील भाटिया कोल वॉशरी जवळ दोन दुचाकी आपापसात भिडल्या. यात दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी दुचाक्या ताब्यात घेतल्या आहेत. Two bikes collided with each other. Three people were seriously injured

अनिकेत बंडू शेंडे (23) राहणार निंबाळा व नामदेव गंगाराम पारखी (48) राहणार पाटाळा जखमींची नावे आहेत. वणी यवतमाळ मार्गावर शुक्रवार दि. 14 एप्रिल ला रात्री 8 वजताच्या दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या दोन दुचाक्या आपापसात भिडल्या. घडलेला अपघात भीषण होता. या घटनेत दोघे जखमीझाले आहेत. त्यांना नागरिकांनीच रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

यवतमाळ मार्गावर दुचाकी क्रमांक MH-34- Y- 3364 व MH -29 -BY-6852 या दोन दुचाकी आपापसात भिडल्या आहेत. नेमकी चूक कोणाची हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. मात्र अपघात घडताच नागरिकांनी जखमींना उपचारार्थ हलवले. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे.
वणी: बातमीदार