Home Breaking News आणि…शालेय विद्यार्थी धडकलेत उंबरकरांच्‍या घरी

आणि…शालेय विद्यार्थी धडकलेत उंबरकरांच्‍या घरी

● चुटकी सरशी प्रकरण निकाली निघाले

1715
C1 20240404 14205351

चुटकी सरशी प्रकरण निकाली निघाले

Wani news | तालुक्‍यातील महाकालपुर येथील काही विद्यार्थी वणीत शिकतात, माञ बसफेरी नसल्‍याने शाळेत कसे यायचे या विवंचनेत असतांना त्‍यांनी थेट मनसे नेते राजु उंबरकर यांचे घरी धडक दिली. उंबरकरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्‍काळ आगार प्रमुखांना फोन केला आणि चुटकी सरशी प्रकरण निकाली निघाले. he directly attacked MNS leader Raju Umbarkar’s house.

येथील विविध शाळा व महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्‍यांना ये- जा करण्‍यासाठी राज्‍य मार्ग परिवहन विभागाच्‍या बस चा अभाव आहे. बऱ्याच मार्गावरुन बसफेरी नसल्‍याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवासी वाहनांतुन प्रवास करावा लागतो. यामुळे आर्थिेकदृष्‍टया ते विद्यार्थी व पालकवर्गाना परवडणारे नाही.

c1_20230714_17370176
विद्यार्थ्यांसह राजू उंबरकर

तालुक्‍यातील महाकालपुर येथील बरेचशे विद्यार्थी व विद्यार्थिनी येथील जनता शाळेत शिकतात. वर्ग 8 ते 10 मध्‍ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. रोजच्या रोज त्यांना खाजगी वाहनाचा प्रवास  झेपावणारा नाही. म्‍हणुन त्‍या विद्यार्थ्यांनी थेट महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांचे घर गाठून भेट घेतली.

विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय बघता उंबरकरांनी त्वरित महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या वणी आगार व्यवस्थापकास फोन केला. वास्‍तविकता कथन करुन विस्‍तृत चर्चा केली आणि तातडीने बस फेरी सुरु करावी असा सज्‍जड दम दिला. आगार प्रमुखांनी सुध्‍दा सकाळच्‍या सञातील बसफेरी सुरु केली असुन आता वणी – महांकालपूर बस धावणार असल्‍याने विद्यार्थ्यांची गैरसोय दुर झाली आहे.
Rokhthok News