Home Breaking News शिबिरात…106 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

शिबिरात…106 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

114
C1 20240404 14205351
निखाडे यांच्या रक्तदानाची अर्धशतकाकडे वाटचाल

वणी: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दि: 13 ऑगस्टला शिंदोला येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील 106 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर आयोजक शिवसेना उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांची रक्तदानाची 41 वी वेळ होती. रक्तदानाची वाटचाल अर्ध शतकाकडे होत आहे. यावेळी जमा झालेले रक्त चंद्रपूरच्या शासकीय रक्तपेढीत पाठवण्यात आले.

शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा सातत्याने भासतो, यामुळे ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे झाले आहे. याकरिता जनजागृती महत्वाची आहे. रक्त पुरवठ्या अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठीच वारंवार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे संजय निखाडे यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा याकरिता संजय निखाडे मित्रमंडळ सरसावले. कोणतीही प्रसिद्धी व जाहिरात न करता सुध्दा

रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी परीसरातील शिंदोला, कुर्ली, कळमना, चनाखा, गोवारी, पाथरी, परमडोह, चिखली, येनक, येनाडी, कोलगाव, साखरा, शिवणी, मोहदा, कुरई, शेवाळा या गावातील रक्तदाते सहभागी झाले होते.

शिंदोला येथे शनिवारी डॉ. रमेश जोगी यांच्या दवाखान्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदात्याना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी पंचायत समिती सदस्य रुपलता निखाडे, संजय निखाडे मित्र मंडळ व स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार