Home Breaking News जेवणाकरिता धाबा शोधणाऱ्या दोघांना लुटले

जेवणाकरिता धाबा शोधणाऱ्या दोघांना लुटले

766
C1 20240404 14205351

◆तिघांना अटक

वणी :- हिंगणघाट येथील दोघे शहरात मध्यरात्रीला जेवण करण्याकरिता धाबा शोधत असतांना तिघांनी त्यांच्या खिशातील 30 हजार रुपये व 21 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकवल्या प्रकरणी वणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहे.

हिंगणघाट येथील अनवस खा मेहबुब पठाण वय 22 हा आपल्या अन्य एका मित्रा सह वणी येथे आला होता. रात्र झाल्याने त्यांनी जेवण करण्या करिता शहरात धाबा शोधत होते. बाकडे पेट्रोल पंपा समोर असलेल्या सम्राट हॉटेल जवळ रात्री 1:30 वाजताचे सुमारास या दोघांना जर्मन उर्फ शेख अमीर शेख मेहबुब (वय 27) रा.एकता नगर, सोनू उर्फ अतिक खान अमीर खान(वय 27)रा.सिंधी कॉलनी, निखिल मुरलीधर किटकुले (वय 30) रा.जटा शंकर चौक यांनी या दोघांना अडवले व मारहाण करून त्यांच्या खिशातील 30 हजार रुपये नगदी व 21 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

अनवस खा मेहबुब पठाण यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत सांगितली असता ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी तात्काळ पोलीस पथक पाठवून या तिघांना बेड्या ठोकल्या आहे. पुढील तपास पोउनि शिवाजी टिपूरणे करीत आहे.अटकेत असलेला जर्मन उर्फ शेख अमीर शेख मेहबुब वर या पूर्वीही असे अनेक गुन्हे दाखल आहे.