Home क्राईम डोळ्यात फेकली मिरची पावडर आणि चाकू हल्ला…!

डोळ्यात फेकली मिरची पावडर आणि चाकू हल्ला…!

● LCB चा धडाका, तीन गुन्ह्याची उकल, सात अटकेत

1986
C1 20231014 23271210

LCB ची धडाकेबाज कारवाई                      तीन गुन्ह्याची उकल, सात अटकेत

Crime News Pandharkawda | लूटपाट, जबरी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. चोरटे शिरजोर झाल्याचे चित्र निर्माण झालेले असताना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरी, जबरी चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. तीन गुन्ह्याची उकल करण्यात आली तर एका विधी संघर्ष बालकासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. The gang involved in theft and forced theft was detained in Pandharakawda police station.

पांढरकवडा येथील हनुमंत नरसया कदोरेवार आपल्या व्यवसायाचे दोन लाख 40 हजार रुपये दुचकीत ठेवून घरी परतले. गेट उघडत असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने डिक्कीतून रक्कम लंपास करून पळ काढला. हनुमंत यांनी पाठलाग केला असता चोरट्याने डोळ्यात मिरची पावडर फेकून चाकू हल्ला केला होता.

घडलेली घटना गंभीर होती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी गंभीर्याने या घटने बाबत लक्ष केंद्रित केले. तपासाची सूत्रे पांढरकवडा ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन पाढरकवडा येथील पथक अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे करीता तांत्रीक बाबी पडताळून पाहत असताना एक संशयित गळाला लागला.

ताब्यातील संशयीताची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याने त्याचे इतर साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केला असल्याची व सदर गुन्हयासोबतच अधिक दोन गुन्हे केले असल्याचे सांगितले. याबाबत त्याचे इतर सहा साथीदार व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा 8 इसमांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातील संशयीताने प्रत्येक गुन्हा हा वेगवेगळे साथीदारांसह मिळुन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी कडून अन्य गुन्ह्याची उकल झाली. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले 7 आरोपी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेकडुन गुन्हयात चोरी गेलेली मोटर सायकल व नगदी 35 हजार रुपये अशी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo रामेश्वर वंजने, LCB PI आधासिंग सोनोने, PI अमोल माळवे यांचे मार्गदर्शनात LCB API अतुल मोहनकर, अमोल मुडे, सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, भोजराज नरेश राउत, सतीष फुके, तसेच पो.स्टे. पांढरकवडा येथील PSI योगेश रंधे, नितीन सुशीर, प्रमोद जुनुनकर, अंकुश बहाळे, मारोती पाटील, सचिन काकडे, छंदक मनावर, राजु बेलेवार, राजु मुत्तलवार, सूर्यकांत गिते यांनी केली.
Rokhthok News