Home Breaking News वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

● मनसेचे आरिफ शेख यांचे प्रतिपादन ● शेकडो तरुणांचा वाहतूक सेनेत प्रवेश

425
Img 20240215 Wa0034
C1 20240404 14205351

मनसेचे आरिफ शेख यांचे प्रतिपादन
शेकडो तरुणांचा वाहतूक सेनेत प्रवेश

Wani News : वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांचा विश्वास जपणे ही आपली अत्यंत महत्वाची प्राथमिक जबाबदारी आहे. वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सरचिटणीस आरिफ शेख यांनी केले. ते वणीत आयोजित करण्यात आलेल्या वाहतूक सेनेंच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. Maharashtra Navnirman Transport Force is committed to solving the problems of transporters.

लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांचे सध्या दौरे सुरू झाले आहेत. या दौऱ्यात संघटनात्मक बांधणी, उमेदवार आदींचा आढावा घेतल्या जात आहे. त्यातच मनसे झपाटल्यागत विविध सर्वसमावेशक कार्यक्रमाचे आयोजन करताहेत. तर आता मनसेने आपला मोर्चा वाहतूक कडे वळवला आहे.

मतदारसंघांतील वाहतूक क्षेत्रांतील वाहन,चालक, मालक यांना एकसंघ करत पक्षाची ताकद वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या नेतृत्वात संघटन बांधणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन मतदार संघातील वणी आणि मारेगाव येथे वाहतूक सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी राज्य सरचिटणीस आरीफ शेख उपस्थित होतें.

याप्रसंगी वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. तर राळेगाव, वडकी, मारेगावं व वणी शहरात वाहतूक सेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. तर विवीध वाहन चालक व मालकांना संघटनेच्या विवीध पदांचे नियुक्तीपत्र देतं त्यांना या पदाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यावेळी शेकडो तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. आपले मनोगत व्यक्त करताना शेख म्हणाले की, विधानसभा मतदारसंघात मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी मनसे वाहतूक सेनेंचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके , महीला जिल्हा अध्यक्षा अर्चना बोधाडकर, अब्दुल साजिद, शंकर वरघट, फाल्गुन गोहोकार,आजिद शेख, शम्स सिद्दीकी, रुपेश ढोके, गजानन मिलमिले, सचिन येलगंधेवार, शिवराज पेचे, शुभम भोयर, इरफान सिद्दिकी, आकाश दुधकडे, सय्यद युनूस, रोशन शिंदे,सुरज काकडे आदी उपस्थित होते.
Rokhthok News

Previous articlefake call : मी पोलीस अधिकारी बोलतो….!
Next articleमहाविद्यालयीन तरुणांची आत्महत्या
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.