Home Breaking News आठव्या मजल्या वरून पडून इसमाचा मृत्यू

आठव्या मजल्या वरून पडून इसमाचा मृत्यू

1082

शेवाळकर परिसरातील घटना

वणी : येथील शेवाळकर परिसरात वास्तव्यास असलेल्या 68 वर्षीय इसमाचा सदनिकेच्या आठव्या मजल्यावरून तोल गेल्याने पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.

प्रभाकर पाथ्रडकर (68) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. पाथ्रडकर यांनी शेवाळकर परिसरात आठव्या मजल्यावर सदनिका घेतली होती. चार महिन्यापूर्वीच ते परिवारासह सदनिकेत राहायला गेले होते. शुक्रवारी सकाळी 6 वाजताचे सुमारास ते गॅलरीत उभे असतांना अचानक त्यांचा तोल गेला आणि खाली कोसळले.

सदनिकेच्या आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पाथ्रडकर यांचे मोठे बंधू आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी जावई, नातू असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सह शहरातील अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली होती. दुपारी 5 वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)