Home Breaking News आणि अचानक… राजू उंबरकर मुंबईला रवाना

आणि अचानक… राजू उंबरकर मुंबईला रवाना

● मतदारसंघातील महत्वपूर्ण प्रश्नावर चर्चा

2513

मतदारसंघातील महत्वपूर्ण प्रश्नावर चर्चा

रोखठोक | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमतः महत्वपूर्ण बैठकीकरिता राजू उंबरकर यांना मुंबईला पाचारण करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. यावेळी पक्षप्रमुखांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांचे सोबत संवाद साधून मतदारसंघातील महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. Raju Umbarkar has been invited to Mumbai for the first important meeting after being elected as the leader of Maharashtra Navnirman Sena.

मतदारसंघात सातत्याने विविध उपक्रम आणि जनहितार्थ कार्य करण्याचा विडा उंबरकारांनी उचलला आहे. सतत जनतेची कामे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी ते प्रयत्नरत असतात. नैसर्गिक संकट आणि कोणतीही आपदा आल्यास सर्वात पुढे ते असतात हे वणीकर नागरिकांनी अनुभवले आहे.

मतदारसंघात अनेक मूलभूत कामे प्रलंबित आहेत. शहरातील महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे प्रशासन व कंत्राटदाराने बारा वाजवले आहे. प्रदूषणाचा भस्मासुर बोकाळला आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळ कुंभकर्णी झोपेत आहे. आरोग्य व्यवस्था कमालीची ढेपाळली आहे, बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा ठाकला आहे.

मतदारसंघातील नानाविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी उंबरकारांनी थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी बैठकीनंतर मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वणी: बातमीदार