Home Breaking News वेदनादायी …अंत्यसंस्कारास गेलेल्या इसमास ‘मृत्यु’ ने घेतले कवेत

वेदनादायी …अंत्यसंस्कारास गेलेल्या इसमास ‘मृत्यु’ ने घेतले कवेत

542

*दांडगांव येथे एकाच दिवशी दोघांच्या मृत्युने हळहळ

मार्डी : प्रवीण वाळके –एका तरुणाने पाण्यात उड़ी घेवून आत्महत्या केली. त्याचे अंतिम संस्कार पार पाडण्यासाठी उपस्थित शोकाकुल व्यक्ती नदीवर आंघोळीकरिता गेलेत. मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्याने एक जन पाहतापाहता पाण्यात बड़ाला. आणि अवघ्या चोवीस तासात नियतीने दोघांच्या अकाली मृत्युने दांडगाव वर शोककळा पसरविली. या दुर्देवी घटनेने परिसरात धीरगंभीर प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.

मारेगाव तालुक्याच्या सिमेवर असलेल्या दांडगांव येथे शुक्रवारी प्रफुल्ल मत्ते या तेवीस वर्षीय युवकाने बंधाऱ्यांत उड़ी घेवून जीवनयात्रा संपविली. त्याच्या मृत्युने दुख:ची धग गावात कायम असतांना प्रफुल्ल यास अखेरचा निरोप देवून शोकाकुल उपस्थित आंघोळ करण्यास नदीवर गेले. यात 38 वर्षीय पंढरी चिंचुलकर यांना पाण्याचा मागोवा न आल्याने ते पाहतापाहता डोहात बुडाले. काहिंनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता अन्य चार ते पाच व्यक्तींचा जीव वाचला व समोरील अनर्थ टळला.

अवघ्या चोवीस तासात दोघांच्या मृत्युने दांडगांव पुरता हादरला असून नदीतील मृतदेह काढण्यासाठी पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.