Home Breaking News अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

601
C1 20240404 14205351

ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू

वणी: येथील SPM शाळेजवळील वनिता सभागृहाच्या व्हरांड्यात अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह रविवारी आढळला. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना पाचारण केले. महिला जवळपास 70 वर्षाची असावी असा कयास वर्तवण्यात येत असून ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने रविवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास वनिता सभागृहाजवळ बांधकाम विभागाचे कर्मचारी साफसफाई करत होते. त्यावेळेस व्हरांड्यात वृद्ध महिला मृतावस्थेत दिसून आली. त्या कर्मचाऱ्यांनी 112 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना अवगत केले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला असता तिच्या पायाला जुनी जखम असून प्लास्टर केल्याचे आढळले. त्या मृतदेहाला येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले असून तिची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करताहेत. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार