Home Breaking News देशभक्तीपर कार्यक्रम, स्पर्धा, जागरण आणि कीर्तन

देशभक्तीपर कार्यक्रम, स्पर्धा, जागरण आणि कीर्तन

153
C1 20240404 14205351

श्री कृष्ण जन्माष्टमी समितीचे आयोजन

वणी | श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने दि. 15 ते 19 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी सोमवारी ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ या भव्य दिव्य देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर दररोज विविध स्पर्धा, जागरण आणि खंजेरी किर्तन याचा आस्वाद अनुभवता येणार आहे.

सोमवारी सायंकाळी देशभक्तीपर गीत आणि नृत्याचे अप्रतीम सादरीकरण असलेल्या ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ गीत, संगीत आणि नृत्याचा अनोखा संगम असणाऱ्या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारी, शहिदांना संगीतमय मानवंदना दिली जाणार आहे. हा कार्यक्रम श्री विनायक मंगल कार्यालय मुकूटबन रोड, छोरिया ले-आऊट, मध्ये होणार आहे.

मंगळवारी दिवसभर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अमृत भवन, मध्ये कृष्ण दर्शन स्पर्धा (वयोगट 1 ते 5 वर्ष), फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पूजा थाली डेकोरेशन, 1 मिनीट स्पर्धा, अंदाज लावणे स्पर्धा, हाऊजी, लकी लेडी, लकी चाईल्ड, बेस्ट ड्रेस चाईल्ड आणि सायंकाळी जसगायिका कोमल निनावे यांच्या सुमधुर आवाजात “जागरण” हा जय बजरंगी जागरण ग्रुपच्या वतीने प्रस्तुत केल्या जाणार आहे.

बुधवारी टॅलेन्ट शो, गाना, डान्स, अॅक्टींग, मटकी सजावट स्पर्धा, झुला डेकोरेशन, आनंद मेळा मटकी फोडणे स्पर्धा, एक मिनीट स्पर्धा, अंदाज लावने स्पर्धा आणि सायंकाळी सप्त खंजेरी वादक उदयपाल महाराज यांचे खंजेरी किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी सकाळी 10 वाजता विजयबाबू चोरडिया यांचे निवासस्थानावरुन श्रीकृष्ण मुर्तीची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात येणार आहे. तर अमृत भवन येथे स्थापना करण्यात येईल. सायंकाळी सविता ठेंगणे आणि चमु श्रीकृष्ण जन्मावर आधारीत नाट्य प्रस्तुत करणार आहे. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने पाच दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने ऍड. कुणाल चोरडिया, मयूर गोयनका, हितेश गोडे, सागर जाधव, अमोल धानोरक, सचिन क्षीरसागर, राजू रिंगोले, पियूष चव्हाण, मयूर गेडाम, रितेश फेरवाणी, शुभम मदान यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशुतोष पोद्दार, सागर मदान, राजू अडपल्लीवार, कपिल कुंटलवार, मंगेश घोटकर, राज चौधरी, निखिल गोहने, बिट्टू खडसे, निखिल मारखंडे, संकेत रेभे, विनोद खडसे, रोशन जाधव, संदीप जुनघरे, गोविंदा नरपांडे, प्रकाश व-हाटे, विलास आवारी, योगेश आवारी इत्यादी परिश्रम घेत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleअज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला
Next articleबालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.