Home Breaking News घातवार….पुन्‍हा वर्धा नदीत दोघे गेले वाहून

घातवार….पुन्‍हा वर्धा नदीत दोघे गेले वाहून

● जुनाड नदीपाञातील घटना ● दोन घटनेत चौघांचा समावेश

2556
C1 20240404 14205351

जुनाड नदीपाञातील घटना

दोन घटनेत चौघांचा समावेश

Sad News wani | आजचा दिवस घातवार ठरतांना दिसत आहे. वणी तालुक्‍यात दोन ठिकाणी धक्‍कादायक घटना घडल्‍यात. वणी पोलीस स्‍टेशन हदीतील नायगांव व शिरपुर हद्दीतील जुनाड शिवारात घडलेल्‍या घटनेत जलतरण करणारे चौघे वाहून गेल्‍याची घटना मंगळवार दिनांक 15 ऑगष्‍टला दुपारी घडली. Shocking incidents took place at two places in Wani taluka, four were swept away in Wardha river.

रितेश नथ्‍थु वानखडे (18) हा शिवाजी नगर भद्रावती येथील निवासी होता तर आदर्श देवानंद नरवाडे (20) गजानन नगर भद्रावती असे वाहून गेलेल्‍यांची नावे आहेत. भद्रावती वरुन पाच तरुण जुनाड येथील वर्धा नदीच्‍या पुलावर बसलेले होते. त्‍यातील दोघांना नदीपाञात उतरण्‍याचा मोह झाला.

भद्रावती येथील वाहून गेलेले दोघे व रोहन डोंगरे,  अविनाश पचारे, मंथन चिंचोलकर असे पाच मिञ सहज विरंगुळा म्‍हणुन जुनाड येथे पोहचले. सर्व विशीच्‍या आतील तरुण, ते वर्धा नदीच्‍या पुलावर बसलेत. संथ वाहणारी नदी बघुन दोघांना नदीपाञात उतरण्‍याचा मोह झाला. ते बाजुच्‍या मार्गाने नदीत उतरले आणि पोहण्याचा निर्णय घेतला.

वर्धा नदी जेवढी शांत दिसते त्‍या पेक्षा तिचा प्रवाह हा खतरनाक असतो हे आज उमगले. वरोरा मार्गावरील नायगांव येथील दोघे तरुण त्‍याच नदीत वाहून गेले. तसेच जुनाड येथील दोन मिञ सुध्‍दा वाहून गेले आहेत. आजचा दिवस हा घातवार ठरलेला आहे. एकाच दिवशी चार तरुण वाहून गेल्‍याने समाजमन सुन्‍न झाले आहे.

जुनाड परिसरात घडलेल्‍या घटनेची माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळताच ते आपल्‍या कर्मचाऱ्यांसह घटनास्‍थळी पोहचले. त्‍यांनी चंद्रपुर येथील बचाव पथकाला पाचारण केले माञ अंधार पडल्‍याने शोधमोहीम उद्या राबविण्यात येणार आहे. यावेळी शिरपुर पोलीस स्‍टेशनचे सुनील दुबे व कर्मचारी उपस्थित होते.
Rokhthok News

ही बातमी आहे सुद्धा वाचा…..

धक्‍कादायक….. वर्धा नदीत दोघे तरुण वाहून गेले

Previous articleअनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
Next articleत्या..घटनेतील एका तरुणाचा मृतदेह मिळाला
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.