Home Breaking News चक्क…ग्रामसेविकेला ग्रामपंचायत कार्यालयातच केले ‘कुलूपबंद’

चक्क…ग्रामसेविकेला ग्रामपंचायत कार्यालयातच केले ‘कुलूपबंद’

791
C1 20240404 14205351

● इसमावर गुन्हा नोंद, ग्रामसेवक संघटना आक्रमक

वणी- तालुक्यातील बाबापूर येथील ग्रामपंचायतीत कर्तव्यावर असलेल्या ग्रामसेविकेला गावातीलच इसमाने ग्रामपंचायत कार्यालयात ‘कुलूपबंद’ केल्याची घटना मंगळवार दि.14 सप्टेंबर ला घडली. याबाबत तक्रारीवरून शिरपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या घटनेने ग्रामसेवक संघटना आक्रमक होत कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

सचिन मोहन पिदूरकर(45) असे ग्रामसेविकेला कार्यालयात कोंबणाऱ्या इसमाचे नाव आहे. बाबापूर ग्रामपंचायत कार्यालयात स्मिता गणेश काळे(33) ही ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्या कार्यालयीन कामकाज करत असताना सचिन तेथे आला व शिवीगाळ करायला लागला. क्षणाचा विलंब न कारता त्याने कार्यालयाचे दार ‘कुलूपबंद’ करून जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला.

सचिन पिदूरकर हा नेहमीच ग्रामपंचायत कार्यालयात येवून किंवा फोनवर नेहमीच वेगवेगळी माहिती मागत असतो. घटनेच्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ग्रामसेविका कार्यालयीन काम करत असताना तो इसम तेथे आला व त्याने गावातील शाळकरी मुलांसाठी एस टी बसने येण्या- जाण्या करिता ग्रामपंचायतीचा ठराव डेपोत का दिला नाही व माहिती अधिकारात मागितलेली माहिती मिळाली नाही असे म्हणून कार्यालयात उपस्थित असणाऱ्यांना बाहेर काढले व  ‘कुलूपबंद’ करून निघून गेला.

या बाबत ग्रामसेविका स्मिता काळे यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली व शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी सचिन पिदूरकर वर गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सदर इसम फरार झाल्याने त्याला अटक होईपर्यंत ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे.