Home Breaking News अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

● प्रेम आंधळं असतं, यामुळे प्रेमी युगल घरच्या मंडळींना सुद्धा.....

2107
C1 20231015 07384528

पाटण पोलिसात गुन्हा नोंद

Crime News patan | प्रेम आंधळं असतं, यामुळे प्रेमी युगल घरच्या मंडळींना सुद्धा जुमानताना दिसत नाही. 21 वर्षीय तरुणाने गावातील नातेवाईक असलेल्या 16 वर्षीय बलिकेला फूस लावून पळवले. ही घटना शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबरला उघडकीस आली असून झरी जामनी तालुक्यातील पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. A case has been registered at Patan Police Station in zari Jamni Taluka.

मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे एक चौकोनी कुटुंब पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. 16 वर्ष चार महिन्याची मुलगी व 14 वर्षाचा मुलगा असे दोन अपत्य. मुलगी नुकतीच 10 वी पास झाली होती व ती सध्या घरीच राहत असे व शेत मजुरीसाठी जात असायची.

शुक्रवारी मुलीचे आई- वडील दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शेतकामासाठी गेले होते तर मुलगी घरीच होती. सायंकाळी घरी परतल्यावर मुलाने ताई घरात नसल्याचे सांगितले. कुटुंबातील मंडळींनी गावात, नातेवाईकांकडे शोध तिचा घेतला मात्र ती मिळाली नाही. नातेवाईकांना फोन करून विचारणा करण्यात आली मात्र ती गवसली नाही.

गावातून मुलगी बेपत्ता झाल्याने परिवार हतबल झालेले होते. तर त्याच गावातील अनिल कोमा दंडांजे (21) हा तरुण सुध्दा गावात नसल्याचे दिसून आले. कारण तो नात्यातील असल्याने त्याचे नेहमी घरी येणे जाणे होते. यामुळे संशय बळावला व पाटण पोलिसात फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Rokhthok News