Home Breaking News अनर्थ टळला…उंबरकरांनी बजावली अग्निशमन जवानांची भूमिका

अनर्थ टळला…उंबरकरांनी बजावली अग्निशमन जवानांची भूमिका

● राजू उंबरकरांची घटनास्थळी धाव

1112
C1 20231115 12464593

राजू उंबरकरांची घटनास्थळी धाव

MNS NEWS | तालुक्यातील वांजरी येथे मंगळवारी रात्री उशीरा भीषण आग लागली होती. अग्निशमन दलासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले व अग्निशमन जवानांची भूमिका बजावली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. उंबरकरांनी तत्परता दाखवली नसती तर आगीने लगतच्या घरांना कवेत घेतले असते. Officials and workers of Maharashtra Navnirman Sena tried their best to extinguish the fire.

विजेच्या ताराच्या स्पार्किंगमुळे वांजरी येथील एका गोठ्याला आग लागली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती आलेला कापूस जळला, गुरांचे खाद्य असलेले कुटार, शेतीपूरक व्यवसायातील कुक्कुटपालन त्याचबरोबर अन्य शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दुर्घटनेमध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पक्षेनेते राजू उंबरकर यांनी केली आहे.

याप्रसंगी उंबरकर यांनी अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथील रहिवाशांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून परिसरातील रहिवासी लोकांचे आतोनात नुकसान झाले. संकटसमयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभे राहते, याचा अनुभव पुन्हा काल झालेल्या प्रसंगामुळे स्थानिकांना आला.

शेतकऱ्यांच्या हाती आलेला कापूस जळला, गुरांचे खाद्य असलेले कुटार, शेतीपूरक व्यवसायातील कुक्कुटपालन त्याचबरोबर अन्य शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दुर्घटनेमध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विलन बोदाडकर, आकाश काकडे, धिरज बगवा, सूरज काकडे, वैभव पुरानकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News