Home Breaking News भीषण….उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

भीषण….उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

1937
C1 20240404 14205351

करणवाडी फाट्यावरील घटना

रोखठोक | महामार्गावर अपघाताची शृंखला प्रचंड वाढली आहे. भरधाव दुचाकी उभ्या ट्रक वर आदळून एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. 15 डिसेंबर ला सायंकाळी 7: 45 वाजता घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

हरिदास लक्ष्मण टेकाम (27) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे तो सालाईपोड (खंडणी) येथील निवासी होता. तर त्याचा चुलत भाऊ किसन टेकाम (32) हा सुद्धा त्याचे सोबत होता. ते दोघे आपली दुचाकी क्रमांक MH-34-AY-1070 ने गावी परतत असताना करणवाडी फाट्याजवळ नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकला धडकले.

हाच तो ट्रक

ही घटना प्रचंड भीषण होती, अंधारात उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH- 34-AV-3859 वर दुचाकी धडकली. घटनास्थळीच हरिदास चा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी जखमी तरुणाला उपचारार्थ हलवले व मारेगाव पोलिसांना सूचित केले. या प्रकरणी ट्रक चालकांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्य महामार्गावर कोळसा भरून वाहतूक करणारा ट्रक पलटी होतो आणि कोणतीच खबरदारी घेतल्या जात नाही ही अक्षम्य बाब आहे, ट्रक नादुरुस्त असताना महामार्गावरील नियमाचे पालन करण्याची गरज आहे. खबरदारी म्हणून त्या ट्रक चालकाने इंडिकेटर किंवा महामार्गावर ट्रक च्या मागे-पुढे अडथळा निर्माण करणे गरजेचे होते. ते न केल्यामुळेच हा भीषण अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे,.
वणी : बातमीदार

Previous articleआणि…विद्युत निरीक्षक ACB च्या जाळ्यात
Next articleगावातील ऐतिहासिक वारसा करणार जतन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.