Home वणी परिसर नव्‍यानेच बांधलेल्‍या रस्‍त्‍याचा उडणार “बोजवारा”

नव्‍यानेच बांधलेल्‍या रस्‍त्‍याचा उडणार “बोजवारा”

● अवजड वाहनांची वाहतुक थांबवा ● जिल्‍हाधिकारी यांना निवेदन

913
C1 20240404 14205351

अवजड वाहनांची वाहतुक थांबवा
जिल्‍हाधिकारी यांना निवेदन

Wani news | वेकोली (wcl) प्रशासनाच्‍या मनमानी कारभारामुळे दररोज हजारो टन कोळशाची वाहतुक नव्‍यानेच बांधलेल्‍या शिंदोला – चारगांव मार्गावरुन होत आहे. बांधकाम विभागाच्‍या नियमांनुसार 20 टन वहन क्षमता असलेल्‍या मार्गावरुन 50 टन वजनाची अवजड वाहने धावत असल्‍याने रस्‍त्‍याचा पुरता बोजवारा उडणार असुन तातडीने अवजड वाहनांच्‍या वाहतुकीला मनाई करावी अशी मागणी शिवसेना (उध्‍दव ठाकरे) गटाचे उपजिल्‍हा प्रमुख संजय निखाडे यांनी जिल्‍हाधिकारी यांना निवेदनातुन केली आहे. Heavy vehicles weighing 50 tonnes ply on a track with a carrying capacity of 20 tonnes as per the rules of the works department.

वणी एरीयातील मुंगोली, कोलगांव व पैनगंगा कोळसा खाणीतुन उत्‍खनन झालेला हजारो टन कोळसा घुग्‍गूस येथील सायडींग, रोडसेल व अन्‍यञ वाहुन नेल्‍या जातो. परंतु मागील काही दिवसांपासुन वर्धा नदीवरील पुल नादुरुस्‍त असल्‍याने बंद करण्‍यात आला आहे. तर तात्‍पुरत्‍या स्‍वरुपांत बांधण्‍यात आलेला पुल पाण्‍याच्‍या प्रवाहाने वाहुन गेला आहे. यामुळे कोळसा खाणीतुन उत्‍खनन झालेल्‍या कोळशाची वाहतुक अवजड वाहनांतुन केल्‍या जाते.

महत्प्रयासाने चारगांव ते शिंदोला मार्गाचे 47 कोटी रुपये खर्चून नव्‍यानेच नुतनीकरण करण्‍यात आले आहे. रस्‍त्‍याची क्षमता सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या नियमांनुसार केवळ 20 टनाची आहे. माञ परिसरातील कोळसा खाणी व अन्‍य खनिजांची अवजड वाहनातुन तब्‍बल 50 टन वजनाची शेकडो वाहनाद्वारे होणारी वाहतुक रस्‍त्‍याच्‍या दुर्दशेला कारणीभूत ठरणार आहे.

नव्‍यानेच बांधकाम झालेल्‍या शिंदोला ते चारगांव या मार्गावरुन अवजड वाहनांच्‍या वाहतुकीला मनाई करावी अशी मागणी निवेदनातुन करण्‍यात आली आहे.  22  तारखेपुर्वी याविषयांवर तोडगा काढावा अन्‍यथा 22  तारखे पासुन तिव्र स्‍वरुपांचे आंदोलन छेडण्यात येईल व अवजड वाहनांची वाहतुक ठप्‍प करण्‍यात येईल. असा इशारा देण्‍यात आला आहे. सदर आंदोलनात स्‍थानिक नागरीक व शिवसेना (उध्‍दव ठाकरे) गटाचे कार्यकर्ते सहभागी होणार असुन कोणताही अनुचित प्रकार घडल्‍यास प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनातून स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.
वणी: बातमीदार