Home Breaking News हत्या…भाडेकरूने घरमालकाच्या डोक्यात घातला ‘पाटा’

हत्या…भाडेकरूने घरमालकाच्या डोक्यात घातला ‘पाटा’

1588
C1 20240404 14205351

राजूर येथील खळबळजनक घटना

वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे 45 वर्षीय घरमलकाच्या डोक्यात मसाले वाटण्याचा पाटा घालून हत्या केल्याची घटना गुरुवार दि. 16 जून ला पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी पसार झाला आहे.

राकेश केवट (40) असे हत्यारा भाडेकरुचे नाव आहे. तो राजूर कॉलरी येथे मृतक राजू पोचम बोडपेलवार (45) याचे घरी भाडेतत्वावर राहत होता. अनेक महिन्यांपासून घरभाडे देत नसल्याने घरमालकाने खोली खाली करावी अशी मागणी केली होती.

बुधवार दि. 15 जूनला घरमालक राजू याने राकेशला घरभाडे मागितले असता त्या दोघात वाद उत्पन्न झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. काही कालावधीनंतर वाद निवळल्याने घरमालक झोपी गेला. मात्र रागाने तापलेल्या भाडेकरूच्या मनात वेगळेच कारस्थान सुरू होते. त्याला झोप येत नव्हती ही कटकट एकदाची संपवण्याचा निर्णय त्याने घेतला आणि अघटित कृत घडले.

पहाटे चार वाजताच्या दरम्यान भाडेकरू राकेश ने रागाच्या भरात घराच्या बाहेर ठेवलेले मसाला वाटण्याचा पाटा उचलला व गाढ झोपलेल्या घरमालक राजू च्या डोक्यात घातला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पहाटे ही बाब शेजाऱ्यांना कळताच एकच कल्लोळ झाला. पोलिसांना सूचित करण्यात आले, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. तो पर्यंत हत्यारा पसार झाला होता. श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती असून पोलीस तपास सुरू आहे.
वणी: बातमीदार