Home वणी परिसर शहरात मलमुञयुक्‍त अशुध्‍द पाणी पुरवठा…!

शहरात मलमुञयुक्‍त अशुध्‍द पाणी पुरवठा…!

● उंबरकर यांचा खळबळजनक आरोप

504
Img 20240613 Wa0015

उंबरकर यांचा खळबळजनक आरोप

Municipality News : वणीकर नागरिकांना पिण्‍यायोग्‍य पाणी मिळत नसेल तर नगर पालीकेचा उपयोग काय ? असा संतप्‍त सवाल उपस्थित करत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी सत्‍ताधारी व पालीका प्रशासनाच्‍या कार्यपध्‍दतीवर पञ परिषदेतुन ताशेरे ओढले. कृञीम पाणी टंचाई निर्माण करायची आणि नागरिकांना वेठीस धरायचे अशी बेबंदशाही यापुढे खपवून घेणार नाही असा इशारा त्‍यांनी पञ परिषदेतुन दिला.Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar criticized the working methods of the incumbent and municipal administration from the Press conference.

वर्धा नदीवरील रांगणा भुरकी घाटातून शहराची तहान भागविण्‍याकरीता सत्ताधाऱ्यांनी महत्‍वाकांक्षी पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. त्‍या योजनेला पालीका प्रशासनाच्‍या भोंगळ कारभारामुळे सुरूंग लागला आहे. पंधरा दिवसापासुन पाणी टंचाईच्‍या झळा नागरिकांना सहन कराव्‍या लागत आहे. मोटारी जळाल्‍याचे किंवा पावसाळयात मोटारी वाहुन गेल्‍याचे कारण पुढे करुन कृञीम पाणी टंचाई निर्माण केल्‍या जात असल्‍याचे वास्‍तव आता समोर येत आहे.

रांगणा भुरकी घाटातून पाणी पुरवठा ठप्‍प झाल्‍यानंतर निर्गृडा नदीतुन शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्‍यात आला. शहरातील सिंधी कॉलनी, सरकारी रुग्‍णांलय, शेतकरी मंदिर परिसर, दामले फैल या परिसरातील मलमुञयुक्‍त सांडपाणी निर्गृडेत सोडण्‍यात येत असल्‍याने चक्‍क अशुध्‍द पाण्‍याचा पुरवठा नागरिकांना करण्‍यात आल्‍याचा खळबळजनक आरोप उंबरकर यांनी केला आहे.

सांडपाणी आणि मलमुत्रयुक्‍त होत असलेला पाणी पुरवठा पालीकेची अब्रु वेशीवर  टांगणारी आहे.  शहरातील जल शुदधीकरण केंद्र मृतावस्‍थेत असुन पाणीपुरठा करणारी भुमिगत पाईपलाईन जिर्णावस्‍थेत आहे. केवळ अॅलम आणि ब्लिचींगचा वापर करुन  शुध्‍द पाणी पुरवठ्याचा बनाव करण्‍यात येत असल्‍याचे यावेळी उंबरकर यांनी स्‍पष्‍ट केले.

शहरातील नागरीकांना दूषित पाण्‍याचा होत असलेला पुरवठा आरोग्‍याच्‍या दृष्‍टीकोणातुन घातक आहे. आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण झाल्‍या तर आरोग्‍य व्‍यवस्‍था सुध्‍दा सलाईनवर असल्‍याने “इकडे आड तिकडे विहीर” अशी अवस्‍था नागरिकांची होणार आहे. अशुध्‍द पाणी पुरवठा व कृत्रीम पाणी टंचाईमुळे नागरिकांत रोष निर्माण होत असुन “पालीका प्रशासन सुस्‍त,  लोकप्रतिनिधी मस्‍त”  असल्‍याचा आरोप उंबरकर यांनी केला आहे. यावेळी तालुका अध्‍यक्ष फाल्‍गुन गोहोकार, शहर अध्‍यक्ष शिवराज पेचे, आजिद शेख यांची उपस्थिती होती.
Rokhthok News

अन्यथा….आमदारांनी राजीनामा द्यावा

raju umbarkar
raju umbarkar

शहरातील पाणी पुरवठा पंधरा दिवसापासून विस्कळीत झाला आहे. नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्तेच्या धुंदीत मस्त आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असताना तीव्र निकड म्हणून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी खेचून आणावा अन्यथा राजीनामा द्यावा.

राजू उंबरकर
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

C1 20240529 15445424
Previous articleकुख्‍यात व सराईत गुन्हेगारांची ‘धरपकड’
Next articleअन… त्‍या मृतदेहाची ओळख पटली
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.