Home Breaking News आणि… आ. प्रतिभा धानोरकर यांना डावलले..!

आणि… आ. प्रतिभा धानोरकर यांना डावलले..!

● धानोरकर समर्थकांत नाराजी

4529

धानोरकर समर्थकांत नाराजी

Wani News | वणी शहरातील राष्‍ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्‍या काही पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांचा कॉग्रेस पक्षात प्रवेश सोहळा आयोजित करण्‍यात आला आहे. याकरीता कॉग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार हे प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित राहणार आहे. शहरात लावण्‍यात आलेल्‍या बॅनर पोस्‍टरवर दिवंगत खा. बाळु धानोरकर यांचे छायाचिञ लावण्‍यात आले माञ या कार्यक्रमाला आ. प्रतिभा धानोरकर यांना डावलण्‍यात आल्‍यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. Late MP Balu Dhanorkar’s photograph was placed on the banner poster that was put up in the city. Mla Pratibha Dhanorkar was dropped.

चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात दिवंगत खा. बाळू धानोरकर यांनी चांगले वलय निर्माण केले होते. अल्पावधीतच प्रत्‍येक विधानसभा मतदार संघात त्‍यांनी कार्यकर्त्‍यांची फौज निर्माण केली होती. परंतु अल्‍पशा आजाराने त्‍यांचे निधन झाले आणि लोकसभा मतदार संघ पोरका झाला.

कॉग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांचा हा पक्षाचा अधिकृत दौरा नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. बॅनर पोस्‍टर वर दिवंगत खा. बाळु धानोरकर यांचे छायाचिञ लावून निव्‍वळ सहानुभूती मिळविण्‍याचा हा प्रयत्‍न असल्‍याचे घणाघाती आरोप आ. प्रतिभा धानोरकर यांनी भ्रमनध्‍वनीवरुन बोलतांना केले.

आ. प्रतिभा बाळू धानोरकर यांना महत्‍वपुर्ण कार्यक्रमांत जाणीवपूर्वक डावलण्‍यात आल्‍याने धानोरकर समर्थकांत कमालीचा निरुत्‍साह दिसुन येत आहे. दिवंगत खा. बाळु धानोरकर यांचे पश्‍चात कॉग्रेस पक्षाचे संभाव्‍य लोकसभा उमेदवार म्‍हणुन आ. प्रतिभा धानोरकर यांचे कडे बघण्‍यात येते.

कॉग्रेस पक्षात मध्‍ये अन्‍य पक्षीय कार्यकर्त्‍यांचा पक्ष प्रवेश होत असला तरी कॉग्रेस मध्‍येच तर दुफळी निर्माण होणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे लोकसभा मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे.
Rokhthok News